स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित चित्रप्रदर्शनाचे गोव्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या हस्ते मडगाव येथे उद्घाटन
पणजी,
देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या गोव्यातील क्षेत्रीय लोकसंपर्क कार्यालयाने रवींद्र भवन, मडगाव येथे आजपासून तीन दिवसीय चित्रप्रदर्शनाचे आयोजन केले आहे. स्वातंत्र्यलढा आणि गोवा मुक्ती संग-ामावर आधारीत या चित्रप्रदर्शनाचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले.
आतापर्यंत देशाने बरेच काही साध्य केले आहे. नव्या पिढीने देशाला नव्या उंचीवर न्यावे. बर्याच गोष्टी अद्याप करायच्या बाकी आहेत, त्या नव्या जोमाने करु. देश आणि समाजकल्याणासाठी भेदाभेद दूर सारुन सामुहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे उपमुख्यमंत्री याप्रसंगी म्हणाले.
क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोने आयोजित केलेल्या चित्रप्रदर्शनाचे उपमुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना यामुळे इतिहासाची ओळख होईल आणि त्यांना नवी स्फूर्ती मिळेल, असे उपमुख्यमंत्री कवळेकर म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते याप्रसंगी गोवा मुक्ती संग-ामात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार करण्यात आला.
27-29 ऑॅगस्ट चित्रप्रदर्शन सकाळी 9 ते संध्याकाळी 8 सर्वांसाठी खुले आहे. विद्यार्थी, नागरीक यांनी या आयोजनाला भेट द्यावी असे आवाहन क्षेत्रीय प्रचार अधिकारी रियाझ बाबू यांनी केले आहे.