एका महिन्यानंतर पेट्रोल स्वस्त… तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

मुंबई,

बहुतांश शहरांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत आणि अनेक शहरांमध्ये डिझेल 100 रुपयांहून अधिक विक्री होत आहे. मात्र आज रविवारी तेलाच्या किंमती कमी झाल्या आहेत. तेल कंपन्या सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करतात आणि कंपन्यांनी रविवारसाठीही नवीन दर जारी केले आहेत. आजच्या किमती पाहता, इंडियन ऑॅईलच्या वेबसाईटनुसार इंधनाचे दर खाली आले आहेत.

नवीन दरानुसार, डिझेलच्या किमती 10-20 पैशांनी आणि पेट्रोलच्या किंमती जवळपास 10 पैशांनी कमी झाल्या आहेत. शनिवारच्या आधीही तीन दिवस डिझेलच्या किंमतीत कपात करण्यात आली होती, त्यानंतर शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर राहिल्या.

त्याचवेळी, पेट्रोलची किंमत बर्‍याच काळापासून स्थिर होती आणि पेट्रोलच्या किंमतीत शेवटचा बदल 18 जुलै रोजी झाला होता. आता सुमारे एक महिन्यानंतर पेट्रोलच्या किंमतीत बदल झाला आहे आणि किंमती खाली आल्या आहेत.

आजच्या नवीन दरानुसार राजधानी दिल्लीत शनिवारी पेट्रोल 101.64 रुपये प्रति लीटर होता. त्याचबरोबर डिझेल प्रति लिटर 89.07 रुपये होते. मुंबईत डिझेल 96.64 रुपये प्रति लीटर आहे. त्याचबरोबर पेट्रोलची किंमत 107. 66 रुपये प्रति लीटर आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भारी कर यामुळे देशातील पेट्रोल-डिझेलचे दर विक्रमी पातळीवर आहेत.

शहर पेट्रोल (रुपयेलीटर) डिझेल (रुपयेलीटर)

नवी दिल्ली 101.64 89.07

मुंबई 107.66 96.64

कोलकाता 101.93 92.13

चेन्नई 99.32 93.66

नोएडा 98.92 89.64

बँगलो 105.13 94.49

हैदराबाद 105.69 97.15

पटना 104.10 94.86

जयपुर 108.56 98.2

लखनऊ 98.70 89.45

गुरुग-ाम 99.35 89.75

चंडीग़ढ 97.80 88.77

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!