पिएसआय आत्महत्या प्रकरणात ऑॅडिओ क्लिप व्हायरल; धक्कादायक माहिती उघड, आत्महत्येचं गूढ वाढलं

अमरावती,

अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या पोलीस अधिकार्‍याच्या आत्महत्येचं गूढ उकलण्याच्या मार्गावर आहे. पीएसआय अनिल मुळे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी केलेल्या संभाषणाची ऑॅडिओ क्लिप समोर आली आहे. त्यानुसार वरिष्ठ अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून मुळेंनी आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे.

अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये पोलीस उपनिरिक्षक पदावर कार्यरत असलेल्या अनिल मुळे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना 14 ऑॅगस्टला समोर आली होती. या घटनेने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यासह शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता ऑॅडिओ क्लिप समोर आली आहे. सदर ऑॅडिओ क्लिप आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या ऑॅडिओ क्लिपमध्ये मृतक पीएसआय अनिल मुळे यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा सर्व घटनाक्रम आपल्या मित्राला फोनवरून सांगित असल्याचं ऐकायला मिळत आहे.

ऑॅडिओ क्लिपनुसार, अनिल मुळे यांचे पुणे सीआयडी विभागात प्रमोशन झाले होते. मात्र, पोलीस ठाण्यात 6 महिन्यापासून जॉइन करून घेत नसल्याने पीएसआय अनिल मुळे होते तणावात असल्याचं दिसत आहे.

अनिल मुळे यांच्या भावाने नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे समजते. मात्र पोलीस विभाग याबाबतीत गुप्तता पाळत आहेत. पीएसआय अनिल मुळे यांचे आपल्या मित्रासोबतच्या संभाषणाची ही ऑॅडिओ क्लिप सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. तसेच यावरुन आता विविध तर्कवितर्क सुद्धा लावण्यात येत आहेत.

अनिल मुळे हे कठोरा रहाटगाव, रिंग रोड परिसरात आकार अपार्टमेंट येथे वास्तव्यास होते. त्यांच्या राहत्या घरापासून गोल्डन लिफ मंगल कार्यालयासमोरील लेआऊट येथील लिंबाच्या झाडाला गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. अनिल मुळे हे सुरुवातीला गाडगे नगर पोलीस ठाण्यात तर दुसर्‍यांदा राजापेठ पोलीस स्टेशन येथे आणि त्यानंतर फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!