राष्ट्रीय एकात्मता देशाच्या प्रगतीचा पाया आहे. – पं.स.सभापती सोमनाथ जोशी….

क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, नाशिक तर्फे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त वाघेरे येथे कार्यक्रम..

इगतपुरी प्रतिनिधी – ( त्र्यंबक जाधव )

राष्ट्रीय एकात्मता ही आपल्या देशाच्या प्रगतीचा पाया आहे. आपल्या देशाची विविधता, आपले सांस्कृतिक वैभव आणि कोणत्या ही संकटाला सर्वांनी मिळून सामोरे जाण्याची भावना या मुळेच आपण इथपर्यंत विकास केला आहे. असे प्रतिपादन इगतपुरी पंचायति समितीचे सभापती श्री सोमनाथ जोशी यांनी केले. ते भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत येणा-या क्षेत्रीय लोक संपर्क ब्यूरो, नाशिक तर्फे राष्ट्रीय एकता दिना निमित्त आयोजित विशेष प्रचार कार्यक्रमात बोलत होते.

आनंदतरंग फाउंडेशन, वाघेरे यांच्या सहकार्याने वाघेरे येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समिती, घोटीचे प्रशासक संदीप गुळवे, गट शिक्षण अधिकारी राजेश तायडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.बी. देशमुख, सर्व कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाबडसर, साहित्यिक प्रा. गिरीसर, महाराष्ट्र शिक्षण विकास मंडळाचे उपाध्यक्ष खंडेराव भोर, साहित्यकार पुंजाजी मालूंजकर, वैद्कीय अधिकारी डॉ. मनीषा मानकर बाळासाहेब ढोबळे इत्यादी उपस्थित होते.

यावेळी बोलताना गटशिक्षण अधिकारी तायडे म्हणाले की ,आपण आम्ही सर्व देशवासी बांधव आहोत, असे म्हणतो पण पुष्कळदा तसे वागत नाही. सर्वांच्या वेदना आपल्याला जाणवल्या पाहिजे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देशमुख म्हणाले की मागील दिड वर्षात कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे जे नुकसान झाले आहेत, ते कोणत्या ही प्रकारे मोजता येणारे नाही. पुढील काळात सुद्धा आपल्याला कोरोनाअनुरूप वागणूक ठेवावी लागेल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदळे म्हणाले की ,आपल्या देशाला एकसंध ठेवण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांचा या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच त्यांचा जयंती दिनी २०१४ पासून आपण राष्ट्रीय एकता दिन साजरा करतो.

कार्यक्रमाच्या निमित्ताने अंतर्विद्यालयीन निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विजेता विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या स्थळी विशेष कोविड लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमापूर्वी कानडवाडी फाटापासून एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी लोकशाहीर उत्तमराव गायकर आणि त्यांच्या कलापथकाद्वारे देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमात पंचक्रोशीतील सरपंच यांचे सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन भाऊसाहेब जाधव आणि विलास पाटील यांनी केले. या वेळी भारत सरकारच्या युवा एवं खेल मंत्रालय, नेहरू युवा केंद्र नाशिक अंतर्गत इगतपुरी तालुका समन्वयक ओमकार गायकर मोहन भोर, तानाजी उगले,तुषार पाटील, बी.एस. जाधव, एस.एन. वाघ, राजाराम गायकवाड, अमोल गवई, अप्पासाहेब जाधव, मीनाताई भोर, श्रीराम बोटे, मच्छिंद्र कुंदे, ज्ञानेश्वर करवर, साहेबराव जाधव, रोशन लोते, कैलाश जाधव उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दुर्गेश गायकर,शंकरराव दाभाडे, शिवाजी गायकर, देविदास साळवे, विजय भोर, सूनील भोर ,दर्शन भोर ,सागर भोर, विलास भोर ,प्रशांत भिसे, रामकृष्ण मांडे इत्यादींनी परिश्रम केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!