प्रगतशील संघाचे दि.२४ रविवारी रोजी मुरंबी येथे साहित्य संमेलन.
हरसूल (प्रतिनिधी) –
साहित्य, कला ,क्रीडा, अभिनय, शिल्प, नृत्य.पर्यावरण, कामगार, मजूर ,आदी क्षेत्रात काम करणारे प्रगतशील लेखक संघ हा देश पातळीवर विविध राज्यात कार्यरत असून ,एक समाजवादी ,व पुरोगामी विचार धारा असलेल्या प्रगतशील लेखक संघाचे तालुका स्तरिय प्रथमच साहित्य संमेलन हे त्रम्बकेश्वर तालुक्यातील अति दुर्गम भातील मुरंबी या खेडे गावात होत आहे.
हे साहित्ये संमेलन खास करून नवोदित कवी.लेखक ,व विविध क्षेत्रात काम करणारे व्यक्ती ,संस्था यात याचा सहभाग असून या संमेलनाचे अध्यक्ष ,प्रसिद्ध लेखक .व कादंबरीकार, महाराष्ट्र राज्याचे.प्र.ले.स. सचिव ,मा.राकेश वानखेडे हे भुसवणार असून ,स्वागत अध्यक्ष , जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी पर्यावरण प्रेमी ,मा.देविदास जाधव ,हे असतील.तर प्रमुख पाहुणे म्हणून ,व परिसंवादाचे सहभागी मा.डॉ.प्राचार्य, मोतीराम देशमुख, व देवचंद महाले .असतील तसेच, या वेळी होणाऱ्या खुल्या कवी संमेलनात ,नाशिक, पालघर, अहमदनगर, ठाणे, व अन्य ठिकाणाहून नवोदित व इतर कवी सहभागी होतील .व कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रमोद अहिरे हे असतील.असे मंडळाचे ,जिल्हा उपाध्यक्ष संजय दोबडे.तालुका अध्यक्ष तुकाराम चौधरी, नारायण कुवर, कृष्णा राऊत, व विजू पुराणिक यांनी कळविले आहे.