नाशिक झेडपीतील मोठा मासा एसीबीच्या गळाला; 8 लाखांची लाच मागितल्याचा शिक्षणाधिकार्‍यांवर आरोप

नाशिक प्रतिनिधी ,

एसीबीच्या गळाला नाशिक जिल्हा परिषदेतील मोठा मासा लागला असून एसीबीच्या जाळ्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली वीर अडकल्या आहेत. तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20म अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्याकरता 8 लाखांची लाच घेतल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलूचपत प्रतिबंधक कायद्यानुसार शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांच्यासह प्राथमिक शिक्षक आणि शासकीय चालकावर भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते आणि शासकीय चालक ज्ञानेश्वर येवले यांना अटक केली असून शिक्षणाधिकारी वैशाली वीर चौकशीसाठी भद्रकाली पोलिस ठाण्यात होणार हजर होणार आहेत.

राजेवाडी शाळेचे प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांनी 6 जुलै 2021 ला शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांच्यासाठी 9 लाख रूपयांच्या लाचेची मागणी तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20म अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्याकरता तक्रारदाराकडे केली. 27 जुलैला तडजोडीअंती 8 लाख रुपये वीर यांनी मान्य केले.

शासकीय वाहन चालक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले यांच्यामार्फत ही लाच काल संध्याकाळी साडेपाच वाजता त्र्यंबकनाका परिसरात स्वीकारत असतांनाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चालक येवलेला रंगेहाथ पकडले. ठाणे लाचलुचपत विभागाने केलेली ही कारवाई नाशिकमध्ये सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरते आहे.

लाचलुचपत विभागाची रात्री उशिरापर्यंत शिक्षणाधिकार्‍यांच्या दालनात चौकशी सुरू होती. कोरोनाकाळात ग-ामीण भागातील शाळांचे नियोजन आणि इतर महत्वाच्या कामांची वैशाली वीर यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली असतानाच हा प्रकार समोर आल्यामुळे नाशिक जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली आहे. वैशाली वीर यांनी अशाप्रकारे गैरमार्गाने अजून किती संपत्ती गोळा केलीय ? यात अजून कोणा कोणाचा सहभाग आहे ? हे आता चौकशीनंतरच समोर येईल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!