”पर्यावरण पूरक गणेशमूर्ती बनवायला शिका” आणि “भराडी गौर” कार्यशाळेंचे आयोजन
नागपूर , 17 ऑगस्ट 2021
नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने 20 ऑगस्ट 2021 रोजी ”पर्यावरण पूरक गणेशमूर्ती बनवायला शिका” आणि 21 ऑगस्ट 2021 रोजी “भराडी गौर” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही कार्यशाळा केंद्राच्या परिसरात असणाऱ्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आल्या आहेत.
20 ऑगस्ट 2021 रोजी नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि ग्रामायण कौशल्यविकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ”पर्यावरण पूरक गणेशमूर्ती बनवायला शिका” या कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यशाळेमध्ये एकूण दोन तुकड्या असतील , यामध्ये पहिल्या तुकडीची कार्यशाळा सकाळी 11.30 पासून दुपारी 1.30 वाजेपर्यंत असेल तर दुसऱ्या तुकडीची कार्यशाळा दुपारी 4.00 पासून संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत घेण्यात येईल. दोन्ही तुकड्यांमध्ये मिळून एकूण 50 सहभागींना प्रवेश दिला जाईल. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी 19 ऑगस्ट 2021च्या दुपारी 4.00 वाजेपर्यंत या इमेल आणि भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करा – sczcconlineworkshops@gmail.com / 9423399139
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी 500 रुपये (प्रतिव्यक्ति) शुल्क ठेवण्यात आले आहे. या कार्यशाळेत सहभागींनी तयार केलेली मूर्ती त्यांना घरी घेऊन जाता येणार आहे.
नागपूरचे दक्षिण मध्य केंद्र सांस्कृतिक केंद्र आणि महिला कला निकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भातील अनोखी कला “भराडी गौर” या कार्यशाळेचे आयोजन 21ऑगस्ट 2021रोजी दुपारी 3.30 वाजता करण्यात येत आहे. या कार्यशाळेतही 50 सहभागींना प्रवेश दिला जाईल. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी 20 ऑगस्ट 2021 च्या दुपारी 4.00 वाजेपर्यंत या इमेल आणि भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करा –sczcconlineworkshops@gmail.com / 9423399139
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी 100 रुपये (प्रतिव्यक्ति) शुल्क ठेवण्यात आले आहे. या कार्यशाळेतील सहभागींना परडी आणि सजावटीसाठी सदाफुली, गोकर्ण, जास्वंद, यांसारखी विविध रंगांची फुले आपल्यासोबत आणावी लागतील.