||कोरोना आला आणि इतर आजार सुट्टी वर गेले का?….||

आज जवळ-जवळ कोरोनाला एक ते दीड वर्ष पूर्ण होत आले, नव्हे नव्हे तर कोरोनाची तिसरी लाट सुद्धा येऊन ठेपली आहे.स्थिती अतिशय चिंताजनक आहे तसेच पावसाळ्याची सुरुवात आणि वातावरणातील बदल यांमुळे सर्व जण त्रासले आहे.अशा या परिस्थितीत इतर आजारही वाढू लागले आहे.
कोरोना आला आणि इतर आजार सुट्टी वर गेले का ? असा प्रश्न उपस्थित झाला पण असं काहिच नाही कारण कोरोनामुळे आपलं लक्ष इतर आजारांपासून तात्पुरते विचलित झाले.कोरोनाने आपल्या मनांमध्ये भितीचे आवरण घातले आहे, त्यामुळे थोडा जरी ताप आला तर लगेच आपल्याला कोरोनाची भिती वाटायची.
आपण सर्व जण या कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रयत्न करतचं आहोत पण निष्काळजीपणा सोडून आपण पर्यावरणीय बदलांकडे निरखून बघण्याची अत्यंत गरज आहे.
तसेच कचरा व्यवस्थापन, शोषखड्डे, साचलेल्या पाण्याचे नियोजन, परिसर स्वच्छता, तणनाशक फवारणी,या सर्व बारिक -सारिक गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
या सर्व गोष्टींचा अवलंब जर प्रत्येकाने आजपासून सुरू केला ना तर भविष्यात प्रसारित होणाऱ्या रोगराईला आपण आळा घालू शकतो.
|| स्वच्छता आपली संस्कृती,
|| स्वच्छता हिच आपली प्रकृती ||
जर समाजापुढे/ देशापुढे आपल्याला एक नवीन आदर्श निर्माण करायचा असेल तर आधी आपल्या महाराष्ट्राला रोगराई मुक्त बनवूया……||
|| झुंज द्या जिवनाशी,
तेव्हाच नाळ तुटेल कोरोनाची ,
|| आठवण करा शिवरायांची,
वाट धरुन जगण्याची ||
…..||जय शिवराय, जय महाराष्ट्र||
… साक्षी शरद पाटील.
…सावखेडा. – रावेर

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!