रक्तविहीन महान धम्मक्रांती:-
जयभीम म्हणजे हजारो वर्षापासून क्वारंटाईनसमाजाच्या रोगावरील जालीम औषध आहे.धार्मिक, सांस्कृतिक,आर्थिक राजकीय क्षेत्रात महान क्रांती करणारे प.पु.बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशासाठी रचनात्मक कार्य केले. हजारो वर्षाची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी त्यांनी आपल्या देशाला संविधान दिले. शेतकरी, उपेक्षित, वंचित वर्गाच्या हितासाठी त्यांनी मोलाचे प्रबोधन केले. विपुल लेखन केले. रस्त्यावर उतरून संघर्ष केला. संसदेमध्ये आवाज उठविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महान अभ्यासक होते. ते संपादक होते. ते महान शिक्षणतज्ञ होते. ते महान कायदेपंडित होते. ते इतिहासकार होते. ते कृषीतज्ञ जलतज्ञ होते. सनातनी धर्माने नाकारलेले अधिकार इथल्या उपेक्षित, वंचित वर्गाला मिळावेत यासाठी त्यांनी चवदार तळ्याचे आंदोलन केले. काळाराम मंदिर आंदोलन केले. त्यांनी बहुजन समाजाला अधिकार नाकारणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केले. जो धर्म सार्वजनिक ठिकाणी पाणी पिऊ देत नाही, शिक्षण घेऊ देत नाही, दैवतांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात प्रवेश करू देत नाही, तो धर्म आपला कसा असू शकतो ? ही जाणीव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी करून दिली. १९३५ साली नाशिक जिल्ह्यातील येवला या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली “ज्या धर्मात मी जन्मलो, त्या धर्मात मी मरणार नाही. कोणत्या धर्मात जन्मावे, हे माझ्या हातात नव्हते, परंतु कोणत्या धर्मात मरावे हे माझ्या हातात आहे, म्हणून त्यांनी लाखो अनुयायांसह १४ ऑक्टोबर १९५६ साली नागपूर या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. बुद्ध हा केवळ भारताचाच नव्हे, तर जगाचा महामानव आहे. तथागत गौतम बुद्धाने वेदप्रामाण्य नाकारले, महिलावरील निर्बंध नाकारले, अनिष्ट परंपरा नाकारल्या. गौतम बुद्ध हे समतावादी, बुद्धीप्रामाण्यवादी, स्त्रियांचा आदर-सन्मान करणारे,मुलींच्या जन्माचे स्वागत करून मुलीला देखील वंशाचा दिवा मानणारे होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सनातनी अर्थात हिंदुत्ववादी परंपरां नाकारून, भारतीयांचा श्वास तथागत गौतम बुद्ध यांच्या धम्माची १४ ऑक्टोबर १९५६ रोजी अशोक विजयादशमी ला स्वतः धम्म दिक्षा घेऊन आपल्या लाखो अनुयायांना सुध्दा दिक्षा देवून रक्ताचा एकही थेंब न सांडता जागतीक दर्जाची ही महान धम्मक्रांती केली.
तमाम बौद्ध धम्मीय तसेच भारतवासीयांना अशोका विजयादशमी धम्मचक्क पवत्तन (धम्मचक्र प्रवर्तन)धम्म प्रवर्तन दिनाच्या हार्दिक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
राजेश वसंत रायमळे