नियोजन विभागातुन मतदार संघातील विविध विकास कामांसाठी ८ कोटींचा निधी मंजूर

उदगीर येथील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशव्दारासाठी १ कोटी रु – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांची माहिती

उदगीर प्रतिनिधी –

गेल्या पाच वर्षात उदगीर मतदार संघाचा झपाट्याने विकास करून सबंध महाराष्ट्रात ‘उदगीर एक विकासाचे मॉडेल’ म्हणून नावारुपाला आणण्यासाठी या भागाचे आमदार तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरेमंत्री संजय बनसोडे यांनी मतदारसंघात चार ते साडेचार हजार कोटींची कामे करून विकासाचा डोंगर उभा केला आहे.त्यात आणखी भर म्हणून नियोजन विभागाकडून ८ कोटी रुपये मंजूर केले असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात
अधिसुचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात यावा म्हणून ना.संजय बनसोडे यांनी मागणी केली होती. त्यामध्ये उदगीर येथील नळेगाव लातूर रोड वरील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशव्दाराच्या उर्वरित बांधकाम करण्यासाठी
१ कोटी रु., उदगीर शहरातील चौबारा ते उदगीर बाबा किल्ला प्रवेशव्दार पर्यंत सी.सी. रोड करणे ५० लक्ष रु., उदगीर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गृहनिर्माण सहकारी सोसायटी सभागृह बांधकाम करण्यासाठी
५० लक्ष रु., उदगीर शहरातील संत कबीर नगर येथील तपसिध्देश्वर महादेव मंदीर सभागृह बांधकाम करण्यासाठी ५० लक्ष रु., उदगीर शहरातील शेतकी निवास समोर राष्ट्रसंत गाडगे महाराज पुतळा बसविणे व सुशोभिकरण करण्यासाठी ५० लक्ष रु., उदगीर शहरातील खादी ग्रामोद्योग केंद्र, नई आबादी जवळ सभागृह बांधकाम करणे
५० लक्ष रु., उदगीर शहरातील साईधाम सोसायटी येथे सभागृह बांधकाम करण्यासाठी ५० लक्ष रु., उदगीर शहरातील शिवशक्ती नगर येथे सभागृह बांधकाम करण्यासाठी ५० लक्ष रु., उदगीर नगरपरिषद वार्ड क्र. ०४ येथील श्री. साबळे यांचे घर ते श्री. मारोती पांडे यांच्या घरापर्यंत सिमेंट नाली व रस्ता बांधकाम करण्यासाठी ५० लक्ष रु., उदगीर नगर परिषद येथील प्रभाग क्र.१४ कापड मार्केट येथे सभागृह बांधकाम करणे
२५ लक्ष रु., असे एकूण ५ कोटी २५ लक्ष उदगीरसाठी तर जळकोट येथील मुस्लिम समाज सांस्कृतिक सभागृह तयार करण्यासाठी १ कोटी २५ लक्ष रु., जळकोट येथील वीरभद्रेश्वर मंदीर सभागृह बांधकाम करण्यासाठी ५० लक्ष असे एकुण मतदार संघासाठी ७ कोटी तर नगर परिषद मुखेड येथील गणाचार्य मठसंस्थान येथे सभागृह बांधकाम व सुशोभिकरण करण्यासाठी १ कोटी असे एकुण ८ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
सदर निधी मंजूर केल्याबद्दल मतदार संघातील नागरिकांनी ना.संजय बनसोडे यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!