मती भ्रष्टसरकारचा निषेध म्हणून विश्व हिंदू परिषद – बजरंग दल आयोजित – जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे भजन आंदोलनाचे आयोजन…

मती भ्रष्टसरकारचा निषेध म्हणून दिनांक १७जुलै २०२१ शनिवार सकाळी १०:३० वाजता दत्त मंदिर, आकाशवाणी चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत पायी यात्रा/ वारी चे आयोजन

जळगाव वार्ताहर थोर साधुसंतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रामध्ये आज या हिंदुविरोधी सरकारने जे थैमान माजवले आहे. सर्व वारकऱ्यांचं आराध्य असणाऱ्या पंढरी पांडुरंग परमात्म्याच्या यात्रेला परवानगी न देता जबरदस्तीने वारकऱ्यांना स्थानबद्ध केलं आदरणीय संतवीर बंडातात्या कराडकर यांना स्थानबद्ध केलं पंढरपुरामध्ये भगवा जो अनादीकालापासून आहे असा भगव्याचा यांनी विरोध केला वारकरी पोशाख याला विरोध केला म्हणजेच आपल्या देव देश धर्म यांच्यावर हा आघात आहे जी वारी मुघलांकडूनही बंद झाली नाही इंग्रजांकडून सुद्धा जे शक्य झाले नाही ते या सरकारने करून दाखवलं अशा या मती भ्रष्टसरकारचा निषेध म्हणून दिनांक १७जुलै २०२१ शनिवार सकाळी १०:३० वाजता दत्त मंदिर, आकाशवाणी चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत पायी यात्रा/ वारी चे आयोजन केलेले आहे जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे भजन आंदोलनाचे आयोजन केलेले आहे. सर्व धर्माभिमानी जागृत संत ,कीर्तनकार ,कथाकार प्रवचनकार ,वारकरी सर्वांना विनम्र आव्हान प्रार्थना आहे सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपला विरोध प्रगट करावा हीच वेळ आहे जर आज आपण वारकरी म्हणून जर एकत्रित झालो नाही तर येणाऱ्या काळात याहीपेक्षा भयानक आघात आपल्याला सहन करावे लागतील म्हणून सर्वांनी या वारकऱ्यांच्या आंदोलनाला सहकार्य करावे.

नोट : कृपया वारीमध्ये सहभागी होताना आपली पारंपारिक वेशभूषा धोतर कुर्ता फेटा पायजमा कुर्ता या पोशाखात तच सर्व वारकर्‍यांनी यायचे त्याचप्रमाणे प्रशासनाद्वारे कोरोणा संक्रमण वाढू नये यासाठी ज्या काही सूचना आहेत त्या सूचनांचे पालन करणे, मास्क लावणे ,सुरक्षित शारीरिक अंतर ठेवणे ,इत्यादी नियम पालन करणे अनिवार्य राहील .

निवेदक : समस्त वारकरी सम्प्रदाय…विश्व हिन्दू परिषद,बजरंग दल
जळगाव जिल्हा….

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!