संतपीठ स्थापन करण्यासह मराठवाड्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या मोठ्या घोषणा
औरंगाबाद,
मराठवाडा मुक्तिसंग-ाम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्यासह अनेक नेत्यांची कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अनेक घोषणा केल्यात. मराठवाड्यात संतपीठ स्थापन करण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी घोषीत केले. गेल्या अनेक दिवसांपासून हे संतपीठ व्हावे, अशी चर्चा होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाने हे संतपीठ सुरू केले जाणार आहे. हे मोठे विद्यापीठ व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. या संतपीठामध्ये महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील संतांची शिकवण दिली जाईल, असे उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
मराठवाड्यात 200 मेगा व्हॉल्टचा सौरऊर्जेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. येथील विजेचा प्रश्नसोडविण्यासाठी याची मदत होईल. तसेच औरंगाबादमध्ये दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारणार आहोत, असे त्यांनी यावेळी घोषित केले. तसेच औरंगाबाद – शिर्डी या 112.40 किमी मार्गाची श्रेणीवाढ करण्यात येणार आहे. तर समृद्धी महामार्गाला जोडणार्या 194.48 किमीच्या जालना- नांदेड महामार्गाला देखील गती देण्याची घोषणा केली आहे. औरंगाबाद सफारी पार्क जगातले वैशिष्ट्यपूर्ण करणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
150 निजामकालीन शाळांचा पुनर्विकास
दरम्यान, 150 निजामकालीन शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले. निजामशाहीच्या काही खुणा आहेत. निजामशाहीच्या काळातल्या शाळा आता पडायला आलेल्या आहेत. ही काही वैभवशाली परंपरा नाही. म्हणून मराठवाड्यातल्या सुमारे 150 शाळांचा आपण पुनर्विकास करत आहोत. मराठवाडा जगाला देऊ शकतो, अशा काही गोष्टी आपण आज मराठवाड्यात सुरू करत आहोत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
त्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर गेलेल्या एमआयएम कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांचा ताफा अडविण्याचा इशारा देणारे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक पोलिसांनी ताब्यात घेतले. कलम 154 अन्वये रात्री ही कारवाई केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठळक बाबी –
– मराठवाड्यात 200 मेगा व्हॉल्टचा सौरऊर्जेचा प्रकल्प
– औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक उभारणार
– ज्या प्रमाणे निजामांशी लढलो, त्याप्रमाणे करोनासोबत लढू
– निजामकालीन दीडशे शाळांचे पुर्नविकास करणार
– औरंगाबादमध्ये संतपीठ स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
– मुक्तीसंग-ामातील हुताम्यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन
– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग-ाम दिनानिमित्त ध्वजारोहण
मराठवड्याच्या विकासासाठी भरभरुन
– हिंगोली येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्रासाठी 6 कोटी निधी
– औरंगाबाद -अहमदनगर रेल्वे मार्गाला चालना
– औरंगाबाद – शिर्डी हवाई सेवेची चाचपणी
– सातारा-देवळाई भागात भूमिगत मलनि:सारणासाठी 382 कोटी रुपये
– औरंगाबाद : मुख्य रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी 317. 22 कोटी रुपये निधी नगरोत्थानमधून
-परभणी शहरात भूयारी गटार योजनेच्या कामासही गती. 350 कोटी रुपयांची तरतूद
– परभणीसाठी जल जीवन अभियानातून अतिरिक्त पाणी पुरवठा योजना. 105 कोटी
– उस्मानाबाद शहरासाठी 168.61 कोटी रकमेची भूमीगत गटार योजना
-औरंगाबाद : 1680 कोटींच्या पाणी पुरवठा प्रकल्पाचे काम वेगानं पूर्ण करण्याचे निर्देश
– हिंगोली येथे हळद प्रक्रिया उद्योगासाठी4.50 कोटी
– औरंगाबाद – शिर्डी या 112.40 किमी मार्गाची श्रेणीवाढ
– समृद्धीला जोडणार्या 194.48 किमीच्या जालना- नांदेड महामार्गाला देखील गती देणार
-औरंगाबाद सफारी पार्क जगातले वैशिष्ट्यपूर्ण करणार
– औरंगाबाद शहरातील गुंठेवारी नियमित करण्याची प्रक्रीया वेगाने करावी असे निर्देश
-हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ मंदिर परिसराचा विकासासाठी 86.19 कोटी रुपये
– नरसी नामदेव मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी 66.54 कोटी रुपये निधी
– घृष्णेश्वर मंदिर सभामंडप विकास करण्यासाठी वाढीव 28 कोटी रुपये