जळगाव ॲन्टी करप्शन ब्युरो युनिटचे पोलीस उपअधीक्षक गोपाल ठाकुर यांच्या जागी पोलीस उपअधीक्षकपदी सतिश भामरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र सारथी जळगाव प्रतिनिधी

जळगाव अँन्टी करप्शन ब्युरो युनिटचे पोलीस उपअधीक्षक गोपाल ठाकुर यांचा शासकीय सेवा कालावधी काल 31 मे रोजी संपुष्टात आला. त्यांची सेवानिवृत्ती झाल्यामुळे त्यांच्या जागी आता उपअधिक्षक सतिष भामरे यांनी कार्यभार सांभाळला आहे.

उप अधिक्षक सतिष भामरे यांनी जळगाव पोलिस दलात सेवा बजावली आहे. बोदवड पोलिस स्टेशन, शहर वाहतुक शाखा तसेच नियंत्रण कक्ष अशा विविध ठिकाणी त्यांनी आपली सेवा बजावली असल्यामुळे ते सर्वांना परिचीत आहेत. त्यांना जळगाव जिल्ह्याची चांगल्या प्रकारे माहिती असल्यामुळे त्यांच्या कामकाजाचा जळगाव अ‍ॅंटीकरप्शन विभागाला निश्चितच फायदा होणार आहे.

सरकारी कामकाज करुन देण्यासाठी लोकसेवकाकडून कुणाला लाचेची मागणी होत असेल व त्यासंबंधी कुणाला तक्रार करायची असल्यास पोलीस उपअधीक्षक सतीष भामरे यांच्याशी संपर्क साधावा किंवा तक्रार नोंदवावी असे आवाहन नूतन पोलीस उपअधिक्षक भामरे यांनी कळविले आहे.

कुटूंब तुमचे जबाबदारी आमची..
जळगांव शहरात कुठेही कोरोना पोसिटीव्ह रुग्ण आढळल्यास कॉल करा संपूर्ण घर मोफत सॅनिटायझर करून मिळेल…
जनमत प्रतिष्ठान..
पंकज नाले..
89285 55566
“जन सेवा हिच ईश्वर सेवा’
बातमी शेअर करा :
error: Content is protected !!