पूरग्रस्त नागरिकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दिलासा

कोल्हापूर शहरातील पंचगंगा हॉस्पिटल ते शिवाजी पूल रस्ता पूरबाधित भागाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

कोल्हापूर, दि. 30 -: पूरग्रस्त भागातील नागरिकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे राहील असा दिलासा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापूर शहरातील पंचगंगा हॉस्पिटल ते शिवाजी पूल रस्ता पूरबाधित भागाची पाहणी करताना नागरिकांना दिला.

यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्यासमवेत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.

पूरबाधित भाग पाहणीप्रसंगी पंचगंगा हॉस्पिटल परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात धान्य वाटप करण्यात आले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!