जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या दूरध्वनी क्रमांकात बदल

जालना प्रतिनिधी

27 जुलै

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे जिल्हा स्तरावरील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना हे कार्यालय प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जालना येथे कार्यरत आहे. काही तांत्रिक कारणास्तव या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांकात बदल करण्यात आला असुन नवीन दुरध्वनी क्रमांक 02482-299033 हा आहे.

या कार्यालयामार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण, नोकरी इच्छुक उमेंदवारांची नाव नोंदणी, नियोक्ता नोंदणी, रोजगार मेळावा, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम, बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायट्या, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, इत्यादी योजना व कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येते. या योजना व कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील उद्योजक युवकर्‍युवतीं आणि नियोक्ते यांना नवीन दुरध्वनी क्रमांक 02482-299033 यावर व संपर्क साधता येईल, असे आवाहन सहायक आयुक्त संपत चाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!