स्व.रुपा पहेलवान खरे सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीने कोविड लसीकरण शिबीरास प्रारंभ
जालना प्रतिनिधी
13 जुलै
जिल्हा आरोग्य विभाग प्रशासन, नगर परिषद जालना व स्व.रुपा पहेलवान खरे सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने व भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा युवा आमदार संतोष रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड लसीकरण सप्ताह शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आज दि. 13 जुलै 2021, मंगळवार रोजी भाजपा युवा मोर्चाचे जालना शहराध्यक्ष सुनिल रुपा पहेलवान खरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम मल्लस्र-ाट रुपा पहेलवान खरे व स्व.जगदीश कालुराम खरे यांच्या प्रतिमेस गवळी समाजाचे ज्येष्ठ कन्हैय्या वस्ताद भगत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी गवळी समाज सामुहिक विवाह समितीचे अध्यक्ष तुळशीराम विजयसेनानी, गणेश बटावाले, पारस नंद यादव, समितीचे महासचिव मदन भुरेवाल, मदन वस्ताद भगत, राजु रुपा पहेलवान खरे, भागवत जावळे, गुरु जोशी महाराज, घनश्याम खाकीवाले, सुमित तांदळे (आर्य), अमर झाडीवाले, कपील खरे, शाम गोमतीवाले, गोपाल यादव, अनिल सेठ भगत, रतिलाल भगत, राधेश्याम विजयसेनानी, संतोष भगत, राजेंद्र दायमा, अशोक काबलीये, प.पु.रितेश महाराज व्यास, संजय खरे, प्रशांत वाढेकर, सतीष वाहुळे, पंकज खरे, कमलेश खरे, डॉ.आकाश खरे, मनिष नंद, नारायण भगत, गोवर्धन झाडीवाले, किशोर भुरेवाल, पारस यादव, प्रभु गोमतीवाले, सोन खरे, अलकेश गौड, अभिजीत पाटील, सुरेश कालीवाले, प्रविण भगत, संदीप पवार, शाम गोमतीवाले आदींची उपस्थिती होते.
कोवीड लसीकरण शिबीर आज दि. 13 जुलै 2021, मंगळवार ते 20 जुलै 2021 या पुर्ण सप्ताह कोविड लसीकरण शिबीर चालु राहणार आहे. तरी जालना शहरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुनिल खरे यांनी सांगितले.