कोव्हीड आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान वाटपासाठी सक्षम प्राधिकरण व प्राधिकरणाचा पत्ता प्रसिध्द

जालना,

सर्वोच्च न्यायालयाच्या  दि. 30 जुन 2021 रोजीच्या आदेशानुसार व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दि. 11 सप्टेंबर 2021 रोजी दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार, कोव्हीड -19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 50 हजार रुपये  एवढे सानुग्रह अनुदान देण्यासाठी राज्यांना सुचित केलेले आहे.

त्यानुसार प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग यांनी त्यांच्या  दि. 12 ऑक्टोबर 2021 रोजीच्या पत्रान्वये  दिलेल्या निर्देशानुसार  50 हजार रुपये एवढे सानुग्रह अनुदान वाटपासाठी सक्षम प्राधिकरण व प्राधिकरणाचा पत्ता खालीलप्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, जालना  जिल्हा नियंत्रण कक्ष (आपत्ती व्यवस्थापन प्रभाग) पहिला मजला, जालना संपर्क क्रमांक 02482-223132, टोल फ्री क्रमांक 1077, वेबसाईट  ुुु.क्षरश्रपर.र्सेीं.ळप  ईमेल  ीवलक्षरश्रपरऽसारळश्र.लेा  असा आहे.

जिल्हाधिकारी, जालना हे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष असुन मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याकडुन अर्ज सादर करण्याची ऑनलाईन कार्यपध्दती लवकरच अधिसुचित करण्यात येणार असुन  त्याबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी  जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!