छायाचित्र मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम मतदारांनी मोहिमेत सहभागी व्हावे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे आवाहन

जालना,

भारत निवडणूक आयोगाच्यावतीने दि.01 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचिञासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम दि.09 ऑगस्ट ते 5 जानेवारी, 2022 या कालावधीत घोषित केला असून यात 09 ऑगस्ट, 2021 ते 31 ऑक्टोबर, 2021 पुनरीक्षण  पुर्व उपक्रमात दुबारसमान नोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक ञुटी दुर करणे इ.,मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेट देऊन तपासणीपडताळणी, योग्?यप्रकारे विभागभाग तयार करणे आणि मतदान केंद्राचे सुसुञिकरण व प्रमाणीकरण करणे यांचा समावेश आहे. तर पुनरीक्षण उपक्रमात दि. 01 नाव्हेंबर, 2021 रोजी एकञीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करणे, दि.01 जानेवारी 2021 ते 30 नोव्हेंबर, 2021 या दरम्यान दावे व हरकती स्विकारण्याचा कालावधी, विशेष मोहिमांचा कालावधी, दि.20 डिसेंबर, 2021पयर्ंत दावे व हरकती निकालात काढणे व दि. 5 जानेवारी, 2022 रोजी अंतिम मतदार

यादी प्रसिद्ध करणे याचा समावेश आहे.

सर्व मतदारांनी दि.01 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचिञासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम मोहिमेत सवार्ंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विजय राठोड यांनी केले आहे.

जिल्ह्यातील मतदारांनी त्यांच्या मतदार यादीतील नाव नोंदणी, वगळणे व अन्य  अडचणी असल्यास जिल्?हा निवडणूक कार्यालय किंवा तहसिल कार्यालयातील निवडणूक विभागाशी संपर्क साधावा. तसेच भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्?ट्र राज्य  यांच्यावतीने मतदारांच्या सुलभतेसाठी ऑनलाईन पद्धतीने मतदार नोंदणी व दुरुस्तीसाठी छतडझ पोर्टल, %दूी कात्ज्त्ग्हा अिि व सेवा मतदार पोर्टल उपलब्?ध करुन दिले आहेत.

राज्य निवडणूक आयोगाच्या दि.07 सप्टेंबर,2021 च्या पत्रान्वये सन 2022 मध्ये मुदत संपणा-या नगर परिषदानगर पंचायती आणि जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणूकीसाठी भारत निवडणूक आयोगाच्यावतीने दि.5 जानेवारी 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. सदर मतदार यादी आगामी काळात मुदत संपणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी वापरण्यात येणार आहे.

यामुळे सर्व मतदारांनी दि.01 जानेवारी, 2022 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचिञासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम मोहिमेत सवार्ंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.विजय राठोड यांनी केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!