डी.एक्स मंडळाच्या वतीने कोविड महालसीकरण अभियानाचे प्रारंभ
जालना,
जिल्हा आरोग्य विभाग प्रशासन, नगर परिषद जालना व डी.एक्स.मंडळाच्या संयुक्त विद्यमाने कोविड महालसीकरण अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 15 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर 2021, शनिवार पयर्ंत दररोज सकाळी 10 ते सायं 5 वाजेपयर्ंत राहणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्?घाटन जालना जिल्हयातील पोलीस अधिक्षक विनायक देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सदर बाजार पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिरुध्द नांदेडकर, उद्योजक कैलास लोया, राहुल अग्रवाल, निलेश ओझा, निलेश शर्मा, आकाश गादीया, गौरव बोरा, गोपाल पांचरिया, पियुश शहा, जयप्रकाश शर्मा, कौशल अग्रवाल, कुमार मरगु, सागर शर्मा यांची उपस्थित होती.
कोवीड लसीकरण शिबीर दि. 15 सप्टेबर ते 18 सप्टेंबर 2021, गणेशोत्सवा पयर्ंत कोविड लसीकरण शिबीर चालु राहणार आहे. तरी जालना शहरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाचे पदाधिकारी व गौरवराज बोरा यांनी सांगितले.