वाघोडा तांडा येथील अवैध धंद्यांवर कारवाईसाठी गोर सेनेचा आमरण उपोषणाचा इशारा
जालना,
परतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मंठा तालुक्यातील वाघोडा तांडा येथे गावठी हातभट्टी दारू अड्डयांवर तात्काळ कारवाई करावी नसता जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा गोर सेनेने दिला आहे.
या संदर्भात शुक्रवारी ( ता. 10) परतूर ठाण्यातील पोलीस निरीक्षकांची गोर सेनेच्या पदाधिकारी व तांड्यातील शिक्षण घेणार्या जागृत तरूणांनी भेट घेऊन दिलेल्या लेखी निवेदनात म्हंटले आहे की, वाघोडा तांडा येथे काही दिवसांपासून गावठी हातभट्टी दारूची सर्रास विक्री केली जात असून यामुळे गावातील तरुण व्यसनांच्या आहारी गेले आहेत. याचा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. गोर सेनेच्या पदाधिकारी व गोर सैनिकांनी विक्री करणार्यांना समजून सांगितल्या नंतर ही विक्रेत्यांकडून दारू गाळप व विक्री सुरू असल्याने दररोज भा.ंडण – तंटे वाढत आहेत. असे लेखी निवेदनात नमूद करण्यात आले. मद्यपी लोक हे महिला व तरूणींना विनाकारण त्रास देत असल्याने महिलांचे जगणे अवघड झाले असून येत्या चार ते पाच दिवसांत तातडीने कारवाई न केल्यास गोर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर अमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा लेखी निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर रवी पवार, कृष्णा चव्हाण, संदीप पवार , प्रफुल राठोड, राहुल राठोड , पवन पवार ,सचिन पवार, अमोल राठोड यांच्या स्वाक्षर्या आहेत.