काँग्रेस कमिटी च्या प्रदेश प्रवक्ते पदी डॉ संजय लाखे पाटील यांची फेरनिवड

जालना,

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी च्या प्रदेश प्रवक्ते पदी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे तज्ञ संचालक डॉ संजय लाखे पाटील यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे.

अ. भा. काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस  खा. के. सी. वेणुगोपाल यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ची कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली. यात प्रवक्ते पदी डॉ .संजय लाखे पाटील यांच्या सह पाच जणांचा समावेश आहे.

विद्यार्थी दशेत एन. एस. यु .आय. मध्ये सक्रिय असलेल्या डॉ. संजय लाखे पाटील यांनी एन एस यु. आय. चे मराठवाडा अध्यक्ष पद, विद्यापीठ निवडणूकीत पॅनल प्रमुख म्हणून जवाबदारी सांभाळतांना विद्यापीठ निवडणुकीत काँग्रेस पक्षास यश संपादन करून दिले होते.

पुढे युवक काँग्रेस मध्ये सक्रीय होत जालना जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पद, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सहसचिव, जालना जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस पदे भूषविली, लातूर,उस्मानाबाद, धुळे येथे युवक काँग्रेसच्या निवडणूकांचे प्रमुख , अ. भा. कॉग्रेस पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्य राहिलेले डॉ. संजय लाखे पाटील यांनी रामनगर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पद, महाराष्ट्र सीड्स कॉर्पोरेशन चे माजी संचालक, जालना जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष, बिकनेर येथील महाराजा गंगासिंग विद्यापीठात राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून काम पाहिले आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ सिनेट सदस्य पदी निवडून आले होते. तसेच बी. सी. यु. डी. चे माजी संचालक म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला.

शिवाय अ. भा. काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय समिती तर्फे बिहार, पंजाब, हरियाणा राज्यात लोकसभा निवडणुकांमध्ये मुख्य निरिक्षक म्हणून सुद्धा डॉ. संजय लाखे पाटील यांनी जवाबदारी सांभाळत पक्षाला निवडणुकांमध्ये विजय संपादित करून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका निभावली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तर्फे राज्यातील अकरा जिल्ह्यांत, जिल्हा परिषद,पंचायत समिती, महानगरपालिका, नगर परिषदा, निवडणुका तसेच पक्षीय पातळीवर निवडणूकांत निवडणूक निरिक्षक प्रमुख म्हणून त्यांनी समर्थ पणे भूमिका पार पाडली.

राजकारण, समाजकारण, उद्योग या बरोबरच शैक्षणिक क्षेत्रात ही डॉ संजय लाखे पाटील यांचे व्यापक स्वरूपात कार्य सुरू आहे . ते अध्यक्ष असलेल्या कर्मवीर प्रतिष्ठान मार्फत जालन्यासह राज्यातील काही जिल्ह्यांत माध्यमिक, उच्च माध्यमिक ,कृषी तंत्र विद्यालये, समाजकार्य, अध्यापक  विद्यालये, पर्यावरण, कृषी हरियाली अशा प्रशिक्षण संस्था शिस्तबद्ध पणे  चालविल्या जातात.स्व. बाळासाहेब पवार स्मारक समिती जालना, राजीव फाउंडेशन, जालना गणेश फेस्टिव्हल चे संस्थापक अध्यक्ष म्हणून जवाबदारी सांभाळत असलेले डॉ. संजय लाखे पाटील मराठवाडा विद्यापीठात कबड्डी चे प्रतिनिधी म्हणून सुद्धा जवाबदारी सांभाळत आहेत.

त्यांच्या तीस वर्षातील राजकीय, सामाजिक जीवनाचा अनुभव पक्षाशी एकनिष्ठ पणे राहत वेगवेगळ्या स्तरांवर पक्षाची भूमिका सडेतोड पणे मांडणी करतात. त्यांच्या कार्याची दखल घेत डॉ संजय लाखे पाटील यांना पुन्हा प्रदेश प्रवक्ते पदाची जवाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या फेरनियुक्ती बद्दल आजी- माजी लोकप्रतिनिधी, सर्व आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ संजय लाखे पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!