महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज घेण्यास सुरुवात
जालना,
सन 2021-22 मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके अंतर्गत रब्बी हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके, सुधारीत कृषि औजारे व सिंचन सुविधा साधने या बाबींसाठी इच्छुक शेतकर्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. पीक प्रात्याक्षिके शेतकरी गटामार्फत राबविली जाणार असल्याने पीक प्रात्यक्षिकांसाठी अर्ज करताना संबंधित कृषि सहाय्यकांशी संपर्क करून 10 हेक्टर क्षेत्र असणार्या गटांनी नोंदणी करावी. शेतकर्यांना नोंदणी करण्यासाठी दि. 30 ऑगस्ट, 2021 ते दि.10 सप्टेंबर, 2021 पयर्ंत मुदत देण्यात येत आहे. विहित मुदतीत नोंदणी करणार्या शेतकर्यांचाच विचार केला जाईल.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य कार्यक्रम जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येतो.
कडधान्य (हरभरा) -भरडधान्य (मका) – पौष्टिक तृणधान्य – बियाणे वितरण –
वरीलप्रमाणे नमूद केलेल्या जिल्ह्यांमध्ये हरभरा बियाण्यासाठी 10 वर्षाआतील वाणास 25 रुपये प्रती किलो, 10 वर्षावरील वाणास 12 रुपये प्रती किलो, संकरीत मका रु.95 रुपये प्रती किलो व रब्बी ज्वारी बियाण्यासाठी 10 वर्षाआतील वाणास 30 रुपये प्रती किलो, 10 वर्षावरील वाणास 15 रुपये प्रती किलो, एकूण किंमतीच्या 50 टक्के मर्यादेत अनुदान देय आहे.प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकर्याला 2 हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.
पीक प्रात्यक्षिके –
पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकर्याला 1 एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. बियाणे,जैविक खते, सुक्ष्ममूलद्रव्ये, भू सुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकर्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधीत पिकाच्या प्रकारानुसार 2 हजार रुपये ते 4 हजार रुपये प्रती एकर मर्यादेत ँऊ तत्त्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे. यासाठी कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञांचे सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेजतयार करण्यात येत असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे. तसेच शेतकर्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.