अटल भुजल बाबत आयुक्तांचे यावल पिंपरी तांड्यात मार्गदर्शन
जालना,
अटल भुजल सर्वेक्षण योजनेअंतर्गत यावल पिंपरी तांडा ता. घनसावंगी या गावाची निवड झाली असून भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी बुधवारी ( ता. 25) भेट देऊन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
या वेळी उपसंचालक मेश्राम, विशेष कार्यकारी अधिकारी कैलास अंडील, उपविभागीय अधिकारी कापडणीस, तहसीलदार देशमुख, गट विकास अधिकारी जाधव ,भूजल सर्वेक्षण चे कांबळे, सुरडकर, चव्हाण, नानाभाऊ उगले, देशमुख, पं. स.सभापती भागवत रक्ताटे, सदस्य शेख रहिम, रांजणी चे सरपंच अमोल देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
आयुक्त डॉ कलशेट्टी यांनी योजने विषयी माहिती देऊन योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी सखोल मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी राम रोडगे यांनी केले.
या वेळी माजी पं. सभापती बाबुराव राठोड, सरपंच रामनाथ पवार, माजी सरपंच छबुराव राठोड,अर्जुन पवार, ग्रां. पं. सदस्य शेषराव पवार, गणेश राठोड, प्रकाश पवार, भाऊराव राठोड, रमेश पवार, भाऊराव राठोड, बाबुराव चव्हाण, गुलाब राठोड, सिताराम पवार, बालाजी माने, बाबुराव राठोड, विजय राठोड यांच्या सह ग्रामस्थांची उपस्थिती होती.