महिलांसाठी फॅशन डिझायनिंगच्या मोफत प्रशिक्षणाचे आयोजन

जालना प्रतिनिधी ,

जालना ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार अंतर्गत आणि बॅक ऑफ महाराष्ट्र च्या वतीने महाबॅक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था सतकर कॉप्लेक्स पहिला मजला अंबड रोड जालना येथे दि. 01 सटेंबर 2021 ते 30 सटेंबर2021 दरम्यान महिलांसाठी टेलरिंग (फॅशन डिझायनिंग ) चे मोफत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. सदर प्रशिक्षणाचा लाभ जालना जिल्हयातील बेरोजगार महिला घेऊ शकतात. प्रशिक्षणासाठी उमेदवार बेरोजगाराचे वय 20 ते 45 वयोगटातील 10 वी 12 वी पयर्ंत शिकलेले व उमेदवाराला स्वत:ला स्वयंरोजगाराची आवड व कामाची प्राथमिक माहिती असावी ग्रामीण दारिद्र रेषेखालील व्यक्तीना प्राधान्य दिले जाईल त्यासाठी कुटुंब दारिद्र रेषेखालील मुळ प्रमाणपत्र दाखविणे आवश्यक आहे.सदर प्रशिक्षणात मुख्य विषयासोबत व्यक्तिमत्व विकास संवाद कौशल्य व्यावसायिक गुणवत्ता , आरोग्य ,योगासने, व प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात येते. प्रशिक्षण मोफत असुन प्रशिक्षण दरम्यान निवास, जेवण, चहा या सोया विनामुल्य पुरविण्यात येतात या परिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांनी , खालील कागदपत्रे सोबत आणावी व  कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा

कागदपत्रांचा तपशिल

शाळा सोडल्याचा दाखला ,गुणपत्रक,आधार कार्ड ,पॅन कार्ड ,मतदान कार्ड शिधापत्रिका, पासपोर्ट साईज चार फोटो , मनरेगा जॉबकार्ड ,रोजगार नोंदणी कार्ड, दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र वरील सर्व मुळ झेरॉक्स प्रतीसह वरील पत्यावर उपस्थित राहावे, असे महाबँक ग्रामीणस्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, जालना यांच्यावतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!