धुळे अनुसुचित जमात प्रमाणपत्र पडताळणी समिती जनहित याचिका निर्णय औरंगाबाद उच्च न्यायालयात लवकरच…
आदिम अनु. ठाकूर जमात मंडळ, महाराष्ट्र राज्याच्या वतीने धुळे अनु. जमात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कार्यालय हे धुळे येथेच ठेवावे यासाठी आदिम मंडळाचे राज्याध्यक्ष मा.यशवंत नानासाहेब बागुल यांच्या नेतृत्वाखाली व मंडळाचे कायदेशीर सल्लागार मा.दरबारसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मा.उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दिनांक :-8/6/2021 रोजी जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात आली होती. सदर जनहित याचिका क्र.59/2021 ची दिनांक :- 23/6/2021 रोजी प्रथम सुनावणी होवून मा.उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठा कडून शासनाच्या आदिवासी विकास विभाग व आदिवासीं संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (TRTI) याना जारी करण्यात आलेल्या नोटीशीत अनुसुचित जमात प्रमामपत्र पडताळणी समिती धुळे च्या स्थापनेबाबत सरकारने आतापर्य॑त काय कार्यवाही केलीॽ अशी विचारणा करण्यात आली होती.व केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर खुलासा 5 आठवड्यात न्यायालयात सादर करावा असा आदेश देण्यात आला होता. त्याअनुषंगाने मा.न्यायालयाने पुढील सुनावणी ही दिनांक :- 28/7/2021रोजी होईल असे आदिम मंडळास पत्र देवून कळविण्यात आले आहे.
सदर जनहित याचिकेचे कायदेशीर कामकाज आदिम मंडळाच्या वतीने निष्णांत विद्यमान विधीतज्ञ मा.श्री. मयुरजी साळूंके साहेब व मा.श्री.मयुरजी वानखेडे साहेब हे पाहत आहेत.अशी माहिती ही आदिम मंडळाचे महासचिव श्री.पी.एस.आहिरे व सहसचिव श्री.वासुदेव ठाकूर यानी दिली आहे.