जळगाव जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध सर्व दुकानांना 4 वाजेपर्यंतची मूभा अत्यावश्यक सेवा वगळता शनिवार, रविवार बंद
दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव प्रतिनिधी
जिल्ह्यात करोनाचा नवीन विषाणू डेल्टा व्हेरीयंट प्लस या विषाणूची लागण होणार्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे जळगाव जिल्हाधिकार्यांनी 27 जून रोजी पासून जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहे. यात अत्यावश्यक सेवेसह कृषी संबंधित व इतर सर्व प्रकारच्या दुकानांना 4 वाजेपर्यंतची मूभा देण्यात आली. तसेच सायंकाळी 5 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून शनिवार व रविवार संपुर्ण कडक लॉकडाऊन राहणार आहे.
आज दिनांक 25 शुक्रवार सायंकाळी जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी याबाबतचे आदेश काढले असून जिल्ह्यात वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व उद्योग व व्यसायासाठी निर्बंध घालून देण्यात आले आहे. हे आदेश 27 जून रोजी सकाळी 5 वाजेपासून लागू होणार असून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत कायम राहणार आहे. तसेच सायंकाळी 5 वाजेनंतर सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्तींसाठी जमावबंदीचे आदेश देखील जिल्हाधिकार्यांनी काढले आहे.
मॉर्निंग वॉकला वेळेचे बंधन
नागरिकांना फिरण्यासाठी किंवा मॉर्निंग वॉकसाठी पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे.शासकीय, खासगी कार्यालयात 50 टक्के उपस्थिती
शासकीय कार्यालयांसह खासगी कार्यालयात 50 टक्के कर्मचार्यांच्या उपस्थितीने सुरु राहणार आहे. दरम्यान खासगी कार्यालयांना सायंकाळी 4 वाजेपर्यंतची वेळ मर्यादा राहणार आहे.
सार्वजनिक वाहतूक शंभर टक्के सुरु राहणार
सार्वजनिक वाहतुक शंभरटक्के क्षमतेने सुरु राहणार आहे. तसेच मालवाहू व्यवस्था सुरु राहणार असून त्यासाठी केवळ 3 जणांना परवागी असेल.
जीम, सलून, स्पा सेंटरला ही नियमावली
जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा व वेलनेस सेंटर हे 50 टक्के क्षमतेने प्रि- बुकींग पद्धतीने सुरु राहणार आहे. याठिकाणी एसीचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
आंतर जिल्हा प्रवासासाठी ई- पास आवश्यक
शासनाच्या नियमालीनुसार लेव्हल 5 मध्ये समाविष्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रवास करण्यासाठी पोलीस विभागाकडून आंतर जिल्हा प्रवासासाठी ई- पास आवश्यक लागणार आहे.
ऑनलाईन शिक्षणाला परवानगी
सर्व प्रकारची शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण, खासगी क्लासेस पुर्णत: बंद राहणार असून केवळ ऑनलाईन शिक्षण सुरु राहणार आहे.
दुकानात पाच पेक्षा अधिक जणांना प्रवेशबंदी
अत्यावश्यक सेवेसह इतर सर्व प्रकारच्या दुकानांना दुपारी 4 वाजेपर्यंतची मुभा देण्यात आली आहे. तसेच एकावेळी पाचपेक्षा अधिक ग्राहकांना दुकानात प्रवेश बंदी असून दुकानाच्या दर्शनी भागात प्लास्टीकचे शीट किंवा पडदा लावणे आवश्यक राहणार आहे.
मॉल, थिएटर बंद तर हॉटेल, बार 50 टक्के क्षमतेने
शॉपिंग मॉल, थिएटर्स, मल्टीप्लेक्स हे पुर्णपणे बंद राहणार असून हॉटेल, बार आणि रेस्ट्रॉरंट हे 50 टक्के क्षमतेने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. तसेच सायंकाळी 9 वाजेपर्यंत केवळ पार्सल किंवा घरपोच सेवा सुरु ठेवण्याची मूभा देण्यात आली आहे.
लग्नासाठी परवानगी
सामाजिक, सांस्कृतीक, राजकीय किंवा मनोरंजनात्क कार्यक्रमांना 50 टक्क्यांच्या उपस्थितीने दोन तासाची मुभा देण्यात आली आहे. तसेच लग्नसमारंभासाठी 50 जणांना परवानगी राहणार असून सायंकाळी 4 वाजेपर्यंतची वेळमर्यादा आखून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अंत्यविधीसाठी केवळ 20 जणांनाच परवानगी असणार आहे.
शासकीय कार्यालयांसह
कार्यालयात 50 टक्के कर्मचार्यांच्या उपस्थितीने सुरु राहणार आहे. दरम्यान खासगी कार्यालयांना सायंकाळी 4 वाजेपर्यंतची वेळ मर्यादा राहणार आहे.
द्यावा लागणार 500 रुपये दंड
शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. यात सोशल डिस्टन्सिंग, मास्कसह सॅनिटायझरचा वापर आवश्यक आहे. ज्या नागरिकांकडून नियमांचे पालन केले जाणार नाही. त्यांच्याकडून 500 रुपये दंड वसूल केला जाणार असून त्याची जबाबदारी ही पोलीस व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांची असेल.
शोषित, पीडित, दलित, वंचितांचा बुलंद आवाज दैनिक “महाराष्ट्र सारथी“