आज अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ दिंडोरी, प्रणित केंद्र गुरुकुल कॉलनी व पर्यावरण प्रकृती विभागाचे वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न…
दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव प्रतिनिधी
जळगाव आज दिनांक 24 रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ दिंडोरी, प्रणित केंद्र गुरुकुल कॉलनी व पर्यावरण प्रकृती विभागाचे वतीने
परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने 21 झाडे लावण्याचा संकल्प झाला व वटपौर्णिमा निमित्ताने वड निंब ही झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले,
सर्वात आधी अप्पर पोलीस अधीक्षक श्री चंद्रकांतजी गवळी साहेब व सौ स्वातीताई गवळी यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले, नंतर ब्यारिस्टर श्री निकम चौक येथे आयकर आयुक्तश्री मकवाने साहेब व त्यांच्या मातोश्री श्रीमती मकवाने यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच एस पी ऑफीस येथील ग्राउंडवर श्री सोपान पाटील साहेब व त्यांच्या संपूर्ण टीमच्या वतीने वृक्षारोपण संपन्न झाले.
सदर वृक्षारोपण प्रसंगी वसंत पाटील (श्री स्वामी समर्थ केंद्र पर्यावरण प्रतिनिधी) यांनी वृक्ष संवर्धन व वृक्षारोपण ही काळाची गरज आहे याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रमाला श्री विजयजी निकम सर यांनी वृक्षारोपण साठी शुभेच्छा दिल्या. डॉ श्री विनोदजी शाह . श्री आर् व्ही चौधरी. स्वामी समर्थ सेवेकरी महिला व पुरुष उपस्थित होते.
सदर कार्याला खान्देश माळी महासंघाचे जिल्हा अध्यक्ष श्री गजानन महाजन यांचे विशेष सहकार्य लाभले.