निंभोरा येथील महिलांनी पुढाकार घेत अवैध दारूविक्री बंद करण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनास निवेदन दिले.

खिर्डी.रावेर (प्रतिनिधी):- खिर्डी येथून जवळच असलेल्या निंभोरा बु. येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत कोळीवाड्यातील महिलांनी एकत्रित येऊन अवैध दारूविक्री बंद करण्या विषयी कंबर कसली असून ग्रामपंचायत प्रशासनास निवेदन देण्यात आले.गावातील कोळीवाडा येथे मोठ्या प्रमाणावर अवैध दारूविक्री होत असल्याने लहान मोठे तरुण खूप मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे.त्या मुळे मृत्युदराचे प्रमाण वाढले असून १७ते३० वयोगटातील व्यसनाधीन पुरुषांची संख्या वाढत असून लहान वयोगटातील मुलांना सुध्दा व्यसन लागत आहे.यासर्व गोष्टीचा वाड्यातील महिला व नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.तसेच गावातील प्रथम जबाबदार नागरिक म्हणून सरपंच साहेबांनी या गंभीर स्वरूपाच्या विषयाकडे विशेष लक्ष देवून गावातील अवैध दारूविक्री बंद करावी व आजच्या तरुण पिढीला व्यसनाधीनते पासून वाचवावे अश्या प्रकारचे निवेदन महीलावर्गाकडून ग्रा.पंचायत प्रशासन दिले असून लवकरच संबंधित अधिकारींना निवेदन देण्यात येईल असे महिलांनी मंडे टू मंडे शी बोलतांना सांगितले.तसेच या निवेदनाला मनसे चे रावेर तालुका उपाध्यक्ष स्वप्नील चौधरी(जावळे) यांनी पाठिंबा दिला असून त्वरित कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.तसेच
मागील दीड ते दोन महिन्यांपूर्वी निंभोरा पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्यांवर निंभोरा सह परिसरात वॉशआऊट करून गुन्हे दाखल करीत अवैध दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवरल्या होत्या त्याच प्रमाणे सातत्याने कारवाई होणे अपेक्षित आहे.

तिक्रिया:- अवैध गावठी दारू
(पन्नी) यामध्ये नशेसाठी विषारी द्रव मिळविला जातो. हि दारू शरीराला खूप घातक असून युवा पिढी मृत्यूच्या दारी ओढली जात आहे.या कडे अधिकारी वर्गाने विशेष लक्ष देवून अवैध दारूविक्री थांबवावी. अन्यथा उपोषण करण्यात येईल.याला मनसेचा परिपूर्ण पाठिंबा राहील.
स्वप्नील चौधरी(जावळे)
मनसे रावेर तालुका उपाध्यक्ष.

सरपंच साहेबांनी संपूर्ण गाव दारू विक्री बंदी करून युवकांना व्यसनाधीनते पासून वाचवावे व अवैध दारूविक्री बंद करण्यात यावी.
महेंद्र संतोष कोळी
निंभोरा बु.(कोळी वाडा) येथील रहिवाशी.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!