जळगाव जिल्हा दूध संघातील मंडळाची मुदत संपली असताना सुध्दा भरतीसाठी एवढी घाई का ? आमदार गिरीश महाजन.

दैनिक महाराष्ट्र सारथी जळगाव प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्या दूध संघातील मंडळाची मुदत संपली आहे ,आता ते काळजीवाहू संचालक मंडळ आहे अशा परिस्थितीत धोरणात्मक निर्णय घेता येत नाही काळजीवाहू संचालक मंडळाला भरती करण्याचा कायद्यानुसार अधिकारच नाही मग एवढी घाई का,? भरती प्रक्रिया राबविण्या मागे हेतू काय ?
ही बाब महत्वाची आहे
कोविड मुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर होत्या मात्र आता महिन्याभरात सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामुळे ही भरती प्रक्रिया रद्द झालीच पाहिजे अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी दिली
.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!