भुसावळ तालुक्यातील वरणगाव पोलीस स्टेशन येथे कोरोना काळातही लाच स्वीकारत असतांना अँटी करप्शन ब्युरो ची मोठी कारवाई.
दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ प्रतिनिधी प्रशांत पाटील
आज संपूर्ण जग हे कोरोना महामारी नी त्रस्त झाले आहे उद्योग व्यवसायाचे करोडो रुपयांचे नुकसान झाले असून या महामारी मुळे सर्वसाधारण लोकांचे जगणे जिकरीचे झाले असून अशा परिस्थितीत सुद्धा लाच स्वीकारणाऱ्यांना याचा किंचित हि फरक पडलेला दिसून येत नाहीं
वरणगाव पोलीस स्टेशन येथे उपनिरीक्षक सुनिल जगन्नाथ वाणी वय 56 व हवालदार गणेश महादेव शेळके वय 31 बक्कल क्रमांक 2037 दिनांक 10 जून रोजी एक वाजण्याच्या सुमारास लाच स्वीकारत असतानाअँटी करप्शन ब्युरो कडून रंगेहात पकडण्यात आले आहे
सविस्तर माहिती अशी की तक्रारदार यांच्या रेतीचा व्यवसाय असून यांच्या मालकीचे डंपर क्रमांक M H 40 AN 4086 हे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाळू वाहतूक करताना आढळून आले असता
सदर हुन त्या वाहनावर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात आरोपी क्रमांक 1 यांनी पंचांसमक्ष दहा हजार रुपये लाचेची मागणी केली व सदर लाचेची रक्कम मागणीप्रमाणे आरोपी क्रमांक दोन यांनी वरणगाव पोलीस स्टेशन मध्ये पंचांसमक्ष स्वीकारली असता हश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस हे कायम सतर्क असतात पोलिस हे जनतेसाठी स्वतःचे बलिदान सुद्धा देतात शहरातील जनतेचा पोलिसांवर एक विश्वास असतो पोलीस वर्दी परिधान करण्याच्या अगोदर शासनाकडून कायद्याचा सन्मान राखला जावा म्हणून शपथ दिली जाते कि मी परिधान केलेल्या वर्दीचा कायम सन्मान करेल व इमान इतबारे ने जनतेची सेवा करील अशी शपथ घेऊन सुद्धा असे लाच घेण्याचे प्रकार हे वाढतच चालले आहे.
आरोपींनी अजून कुणा कुणाकडून अशा प्रकारे वर्दीचा गैरफायदा घेत धाक दाखवून लाच स्वीकारुन बेनामी संपत्ती माया जमवलेली आहे ती जप्त करावी
या विषयाची सखोल चौकशी करून योग्य ती कठोर कार्यवाही करावी जेणेकरून यापुढे सरकारी कार्यालयात लाच स्वीकारण्याचे धाडस कोणी करणार नाही अशी वरणगाव शहरातील आम जनतेमधून मागणी केली जात आहे.
नाशिक प्रमुख मार्गदर्शक अँटी करप्शन ब्युरो चे
माननीय श्री सुनील कडासने पोलीस अधीक्षक माननीय श्री निलेश सोनवणे अप्पर पोलीस अधीक्षक माननीय श्री विजय जाधव पोलिस उपअधीक्षक
जळगाव सापडा मार्गदर्शन
माननीय श्री सतीश भामरे पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो
जळगाव सापडा व मदत पथक
P I संजोग बच्छाव
P I लोधी सहाय्यक फौजदार दिनेश सिंग पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक अहिरे पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील पाटील सहाय्यक फौजदार सुरेश पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र घुगे पोलीस नाईक जनार्दन चौधरी पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पाटील पोलीस कॉन्स्टेबल देशमुख पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर धनगर पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पौड पोलीस कॉन्स्टेबल महेश सोमवंशी
आरोपींचे सक्षम अधिकारी
माननीय पोलीस अधीक्षक जिल्हा जळगाव