अन्याय अत्याचार निर्मूलन समिती जळगाव तर्फे शिक्षक दिनी आदर्श महिला शिक्षिकांचा गौरव.

अन्याय अत्याचार निर्मुलन समिती जळगाव तर्फे शिक्षक दिनानिमित्त शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आदर्श महिला शिक्षिका यांचा शाल ,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

आज दिनांक 5 सप्टेंबर रविवार रोजी अन्याय अत्याचार निर्मुलन समिती जळगाव तर्फे शिक्षक दिनानिमित्त शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आदर्श महिला शिक्षिका यांचा शाल ,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी मा डॉ स्मिता जोशी मॅरेज कौन्सिलर कौटुंबिक न्यायालय जळगाव, मा श्री चंद्रशेखर नेवे सेवाधर्म संस्था , वृक्षसंवर्धन समिती अध्यक्ष तसेच अन्याय अत्याचार निर्मुलन समिती जिल्हाध्यक्ष मा ॲड सीमा जाधव आणि कार्याध्यक्ष मा मनीषा पाटील या मान्यवरांची उपस्थिती होती.

मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाच्या सुरुवातीस थोर शिक्षणतज्ञ आणि पूर्व राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. प्रास्ताविक श्री मनोहर चौधरी जिल्हा सल्लागार यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते श्रीमती इंदुबाई चतरसिंग राजपूत, श्रीमती छाया रवींद्रसिंग वतपाळ रायपूर ,श्रीमती ज्योती लिलाधर राणे साळवा ,श्रीमती छाया अजय पाटील कानळदा, सौ मनीषा शैलेश शिरसाठ पाळधी यांचा सन्मान करण्यात आला.

सत्कारार्थी मनोगत सौ छाया पाटील यांनी मांडले. मान्यवर मनोगतामध्ये मा श्री चंद्रशेखर नेवे यांनी शिक्षक हा गुरू हवा त्याने आपले विद्यार्थी घडविताना समाजासाठी आपण काही देणं लागतो ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात रुजवावी तर मा डॉ स्मिता जोशी यांनी शिक्षक विद्यार्थ्यांना घडविणारा शिल्पकार आहे असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲड वैशाली बोरसे, ॲड हिमानी चौधरी, भारती कापडणे, रेणुका हिंगु ,जयश्री पाटील ,मनोहर चौधरी, ॲड देवेंद्रसिंग जाधव, सुदीप पाटील शहराध्यक्ष,कमलेश पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.

यावेळी अर्चना पाटील,रुद्राणी देवरे, सुमित्रा पाटील तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योती राणे यांनी केले आभार वैशाली बोरसे यांनी मानले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!