सानुग्रह अनुदानासाठी पात्र ऑटोरिक्षा परवानाधारकांनी परिवहन कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन
जळगाव प्रतिनिधी दि. 25 –
कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने ऑटोरिक्षा परवानाधारकांना राज्य शासनातर्फे सानुग्रह अनुदान देण्याचे जाहिर केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ऑटोरिक्षा परवानाधारकांना प्रत्येकी 1500 रुपये सानुग्रह अनुदान वाटप करण्यात येत आहे.
तथापि, ज्या ऑटोरिक्षा धारकांचे अर्ज नामंजूर/रद्द करण्यात आलेले आहेत. अशा ऑटोरिक्षा परवानाधारकांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव येथे समक्ष परवाना विभागात शनिवार व रविवार सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 यादरम्यान संपर्क साधून आवश्यक बाबींची पुर्तता करुन योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.
ऑटोरिक्षा परवानाधारक यांचे मुळ आधारकार्ड बँकेशी संलग्न असलेले आणावेत. आज रोजी वैध असलेला ऑटोरिक्षा परवाना, योग्यता प्रमाणपत्र, मुळ नोंदणी प्रमाणपत्र, मुळ अनुज्ञप्ती, बँकेचे पासबुक किंवा रद्द केलेला चेक आदि कागदपत्रे सोबत आणावीत. असेही श्री. लोही यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.