जिल्ह्यात मंगळवारी 50 मिलीमीटर पावसाची नोंद

जळगाव – दि. 18 –

जिल्ह्यात कालपासून पावसाचे दमदार आगमन झाले असून मंगळवारी (17 ऑगस्ट)जिल्ह्यात 50 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून काल सर्वाधिक 80.7 मिमी पाऊस पारोळा तालुक्यात झाला असून सर्वात कमी पाऊस 28.8 मिमी पाऊस मुक्ताईनगर तालुक्यात झाल्याचे कृषि विभागाने प्रसिध्दीस दिलेल्या अहवालात म्हटले आहे.
कृषि आयुक्तालयाच्या सुधारित नियमावलीनुसार जळगाव जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 719.7 मिलीमीटर इतके आहे. ऑगस्ट महिन्याचे सरासरी पर्जन्यमान हे 196.1 मिलीमीटर इतके असून आजपर्यंत जिल्ह्यात 67.9 मिलीमीटर म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या सरासरीच्या 34.6 टक्के इतका पाऊस पडला आहे.
जिल्ह्यासाठी जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान 123.7 मिलीमीटर, जुलै 189.2 मिलीमीटर, ऑगस्ट 196.1 मिलीमीटर तर सप्टेंबर महिन्याचे सरासरी पर्जन्यमान हे 123.6 मिलीमीटर असे संपूर्ण पावसाळा कालावधीचे सरासरी पर्जन्यमान हे 632.6 मिलीमीटर असल्याचे कृषि विभागाने कळविले आहे.
त्यानुसार जिल्ह्यात तालुकानिहाय जूनपासून आजपर्यंत (18 ऑगस्ट, 2021) पर्यंत पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये कंसात (जून ते आजपर्यंतच्या सरासरीशी टक्केवारी) जळगाव तालुका- 315.3 मिलीमीटर (66.1 टक्के), भुसावळ- 292.2 मि.मी. (69.6), यावल- 292 मि.मी. (65.5), रावेर- 324.6 मि.मी. (76), मुक्ताईनगर- 247.2 मि.मी. (65), अमळनेर- 262.2 मि.मी. (65.3), चोपडा- 233.4 मि.मी. (50.7 टक्के), एरंडोल- 406मि.मी. (96.1), पारोळा- 473.9 मि.मी. (113.73), चाळीसगाव- 427.7 मि.मी. (109.1), जामनेर- 366.9 मि.मी., (78.7), पाचोरा- 364.3 मि.मी. (86.8), भडगाव- 355.7 मि.मी. (84.8) धरणगाव-388.8 मि.मी. (73.4), बोदवड-318.6 मि.मी. (73) याप्रमाणे जिल्ह्यात ऑगस्टपर्यतच्या सरासरीच्या एकूण 333.4 मि.मी. म्हणजेच 78.1 टक्के इतका पाऊस पडल्याचे कृषि विभागाच्या पत्रकात म्हटले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!