सानिया-क्रिस्टिना जोडीला उपविजेतेपदावर समाधान
क्लीवलँड,
भारताची अनुभवी टेनिसपटू सानिया मिर्झा आणि तिची अमेरिकी पार्टनर ख्रिस्टिना मकेल डब्ल्यूटीए 250 टेनिस स्पर्धेच्या विजेत्या ठरल्या. क्लीवलँडमध्ये खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात सानिया-ख्रिस्टिना जोडीचा जपानच्या शुको आयोमा आणि एमा शिबाहारा या अव्वल जोडीने पराभव केला.
भारतीय दिग्गज महिला टेनिसपटू सानिया मिर्झा आणि ख्रिस्टिना मकेल जोडीचा अंतिम सामन्यात जपानच्या जोडीने एक तास 24 मिनिटे रंगलेल्या सामन्यात 7-5, 6-3 ने पराभव केला. पहिल्या सेटमध्ये सानिया-ख्रिस्टिना जोडीने जपानच्या जोडीला कडवी झुंज दिली. पण जपानची जोडी हा सेट 7-5 ने जिंकण्यात यशस्वी ठरली. यानंतर हीच लय कायम राखत जपानच्या जोडीने दुसरा सेट 6-3 असा एकतर्फा जिंकत विजेतेपदाला गवसणी घातली.
जपानच्या जोडीला 10,300 डॉलर तर उपविजेती सानिया-ख्रिस्टिना जोडीला 6000 डॉलरचे बक्षिस मिळाले. दरम्यान, टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये सानिया मिर्झाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. तिने भारतीय युवा खेळाडू अंकिता रैनासोबत जोडी जमवली होती. पण या भारतीय जोडीचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. सानिया यानंतर टीकेची धनी ठरली. आता तिने क्लीवलँड ओपनचे उपविजेतेपद पटकावत टीकाकारांना चोख उत्तर दिलं आहे.