राष्ट्रीय काँग्रेसचे खा.राहुलजी गांधी यांच्या ५१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन संकल्पाची मुहूर्तमेढ रोवली
सातारा जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष विराजभैय्या शिंदे व युवा नेते ऋषिकेश धायगुडे पाटील यांनी वृक्षारोपण करुन जपली सामाजिक बांधिलकी
खंडाळा:
प्रा.हेमंत धायगुडे पाटील
राहुल गांधी हे भारतीय राजकारणातील एक तेजस्वी व सोनेरी ओजस्वी नेतृत्व आहे.त्यांच्या ५१ व्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व संवर्धन संकल्पाची मुहूर्तमेढ खंडाळा तालुक्यातील सुखेड येथे रोवली गेली.या वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रमाचे आयोजन श्री भैरवनाथ नेहरू मंडळ सुखेड,सुखेड ग्रामस्थ व सुखेड कॉंग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने खंडाळा पंचायत समिती उपसभापती श्रीमती वंदनाताई अविनाशभाऊ धायगुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन उपक्रमाची सुरुवात सातारा जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष विराजभैय्या शिंदे व खंडाळा तालुक्याचे युवा नेते ऋषिकेश धायगुडे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आली.देशाचे नेते राहुलजी गांधी यांचा ५१ वा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्रासह देशात ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा केला.
या वृक्षारोपण उपक्रमात खंडाळा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष अतुल बाबा पवार,शिवाजीनगर ग्रामपंचायतीचे सरपंच हर्षवर्धन भैय्या भोसले,शिवाजीनगर गावचे ग्रामपंचायत सदस्य विशाल आण्णा सपकाळ,महाराष्ट्र राज्य मजूर फेडरेशनचे संचालक सुरेश काका धायगुडे,लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मामा रासकर,सुखेड गावच्या उपसरपंच अर्चनाताई धायगुडे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र धायगुडे,युवा नेते अक्षय धायगुडे,खंडाळा तालुका सहकारी दूध संघाचे माजी चेअरमन बाळकृष्ण पडळकर, माजी सरपंच बाळकृष्ण धायगुडे आदी उपस्थित होते.
कोरोना काळात अॉक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन मुबलक प्रमाणात वृक्ष लागवड करून पर्यावरणाचा समतोल राखत खंडाळा तालुक्याचे युवा नेते ऋषिकेश धायगुडे पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी.
विराजभैय्या शिंदे जिल्हाध्यक्ष सातारा जिल्हा युवक काँग्रेस
भारत देशाला एक समृद्ध व आत्मनिर्भर राष्ट्र म्हणून जगात उभे करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातलेल्या नेहरू-गांधी कुटुंबाचा वारसा लाभलेले राहुलजी गांधी हेच देशाला तारू शकतात.तेच देशातील तरूणांचे उज्ज्वल भविष्य आहेत.राहुलजी गांधी यांच्याशिवाय देशात दुसरा सक्षम पर्याय नाही.त्यांना देशाच्या सर्वोच्च पदावर बसवण्यासाठी आम्ही सर्व शक्तीनिशी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
अशी माहिती ऋषिकेश अविनाश धायगुडे पाटील युवा नेता खंडाळा तालुका राष्ट्रीय काँग्रेस यांनी प्रसिद्धीस दिलेली आहे.
वृक्ष संवर्धन काळाची गरज…. झाडे लावा झाडे जगवा…