रेशनच्या संशयास्पद तांदूळ प्रकरणी दोषी आढळल्यास संबंधितांचा परवाना रद्द होणार –
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ताब्यात घेतलेल्या तांदूळ प्रकरणी चौकशी करून संबंधीत दुकानदार दोषी आढळल्यास त्याच्या दुकानाचा परवाना रद्द करणार असून २४ तासात खुलासा करण्याची नोटीस दिली आहे. मागील महिन्यात मार्केट मध्ये तांदूळ खरेदी झाला आहे. त्या तांदुळाची व ट्रक मधील तांदुळाची खात्री करणे सुरू असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती चे मुख्य प्रशासक दिनेश पाटील यांनी सांगितले.
ट्रक क्र. एम एच १९ झेड ०८६० मध्ये १६० ते १७० तांदूळ भरलेल्या गोण्या व खाली जवळपास ८८ भरलेल्या गोण्या रेशनचा काळ्याबाजारात जात असलेला तांदूळ असल्याच्या संशयावरून पत्रकारांनी दि ३ जुलै रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास जवळपास १७० गोण्यांनी भरलेला एक ट्रक मार्केट सचिवांच्या ताब्यात दिला होता. त्याचा पंचनामा करण्यात येऊन दि ५ जुलै रोजी मुख्य प्रशासक व सचिव यांनी संबंधित राज ट्रेडर्स चे व्यापारी दुकानदाराला २४ तासात खुलासा देण्याची कारणे नोटीस दिली आहे. याबाबत तहसीलदार चाळीसगाव यांना पत्र देखील दिले आहे.
संबंधित दुकानदाराने रविवारी सुटीच्या दिवशी नियमांचे उल्लंघन केले असून हा तांदूळ शेतकरी अथवा शेतमजूर यांनी मार्केटला विक्री केला असल्याचे व तशा पावत्या देखील आहे असे सांगितले असले तरी याप्रकरणी चौकशी होणार आहे चौकशी त व्यापारी दोषी आढळल्यास त्याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येणार असल्याची माहिती दिनेश पाटील यांनी दिली आहे.
दरम्यान चाळीसगाव व परिसरातील कुठेही तांदूळ पिकत नाही. विशेष म्हणजे शेतकरी अथवा मजूर बाहेरून कुठूनही तांदूळ आणून व्यापाऱ्यास स्वस्त भावात विक्री करू शकत नाही. म्हणजेच रेशन दुकानावर व कोरोना काळात जनतेला व विद्यार्थ्यांना जो तांदूळ खाण्यासाठी दिला गेला तोच तांदूळ बाजारात विक्री झाला असावा. म्हणून याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.