यावल तालुक्यातील किनगाव येथे एकावर चाकूहल्ला यावल पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
दैनिक महाराष्ट्र सारथी यावल प्रतिनिधी
यावल तालुक्यातील किनगाव मध्ये मागील भांडणाच्या कारणावरून एकावर चाकू हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना तालुक्यातील किनगाव येथे घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, भावलाल पुंडलिक पाटील (वय-५५) रा. किनगाव ता. यावल हे शेती करून आपल्या उदरनिर्वाह करतात. गेल्या काही दिवसांपुर्वी त्यांच्या गावातील प्रदीप इच्छाराम कोळी यांच्यात वाद झाला होता. तो राग मनात ठेवून २३ जून रोजी दुपारी १ वाजता भावलाल पाटील यांना प्रदीप कोळी यांनी मारहाण केली. यात चाकू हल्ला करून पाटील यांना गंभीर जखमी केले आहे. प्रदीप इच्छाराम कोळी, छाया प्रदीप कोळी, राधेश्याम उर्फ शामराव इच्छाराम कोळी, पिंटू शरद कोळी, सरलाबाई पिंटू कोळी, साहेबराव प्रभाकर ठाकूर सर्व रा. किनगाव ता. यावल यांनी बेदम मारहाण केली. भावलाल पाटील यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र खैरनार करीत आहे