अवैद्य दारू विक्री करत असताना वरणगाव पोलीस स्टेशन ची धाड

दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी प्रशांत पाटील

वरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत नागराणी पेट्रोल पंप च्या बाजूला पाटील ढाब्याजवळ सुधीर विजयसिंग पाटील हा अवैद्य दारू विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता
वरणगाव पोलीस स्टेशन येथील एपीआय संदीप कुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली मधुकर भालशंकर पोलीस कॉन्स्टेबल अतुल बोदडे यांनी दोन पंच घेऊन बोहर्डी शिवारातील नागराणी पेट्रोल पंपाजवळ वाहन उभे करून थोड्या अंतरावर पाटील ढाब्याकडे पाई जाऊन पाहिले असता धाब्याच्या बाजूला सुधीर बिदेसिंग पाटील वय 42 राहणार बोहर्डी तालुका भुसावळ हा पुठयात खोके घेऊन बसलेला दिसला
.

त्यावर पंचांची खात्री होतास त्याच्यावर दुपारी 4 -30 वाजेच्या सुमारास अचानक छापा टाकून पकडले असता त्याच्याकडून मिळून आलेल्या देशी विदेशी मालाची मुळ किंमत 3200 रुपये असून
या संबंधित सुधीर बिदेसिंग पाटील याच्या कब्जा तील विना पास परमिट देशी-विदेशी दारू 3200रुपये किमतीची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगताना मिळून आली
.

त्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे
अधिक तपास नरसिंग चव्हाण पोलिस कॉन्स्टेबल अतुल बोदडे करीत
आहे


✍🏻दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण आपल्या परिसरातील बातमी 95940 47437 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपण आपल्या नावाने बातमी दिल्यास आमच्या दैनिक मध्ये प्रसिद्धी केली जाईल.
आपला विश्वासू
प्रशांत पाटील
भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
95940 47437

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!