सरकारला शेतकऱ्यांचे आवाहन…वीज मंडळ बाबत सरकारची भूमिका दुटप्पी….शेतकऱ्यांना म्हणे चोरीची वीजबिल तुम्ही भरा…आम्ही मात्र एक छदाम देणार नाहीत – एस बी नाना पाटील
चोपडा प्रतिनिधी ( हेमकांत गायकवाड mob.-7798202488 )
वीज मंडळ वाचले पाहिजे ही साऱ्यांची भूमिका यात कुठेही कुणात ही दुमत नाही.
वीज चोऱ्या थांबवण्यासाठी काय मार्ग अवलंब करायचे यावर चर्चा होत नाही.त्यासाठी एकतर सगळ्यांना भरायला सोपे जाईल एवढी प्रती युनिट चार्जेस हवेत,म्हणजे चोऱ्या टळतील, लाईनमन व वीज अभियंता यांना पुरेसे संरक्षण द्यावे लागेल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जो पर्यंत ते स्थिरस्थावर होत नाही तो पर्यंत वीज मंडळ ला आर्थिक सहाय्य करावे लागेल.पण सरकार ते करण्याऐवजी जे वीज मंडळाला देय लागते ती रक्कम दिली असे दाखवून,आपल्या टॅक्स घेनेपोटी जमा करून घेते.म्हणजे काहीही न देता आव आणते की आम्ही वीज मंडळ ला मदत केली,आणि प्रत्यक्षात काहीच देत नाही ….ऊर्जा मंत्र्यांना विनंती हा खेळ थांबवा व वीज मंडळ वाचवणेसाठी सकारात्मक पाऊले उचला. सरकारने सरकारच्याच वीज मंडळ कडून कर घेणे बंद करावे…आणि वीज मंडळ ला सहकार्य करावे हि विनंती.