लोक संघर्ष मोर्चाचे वाढत्या महागाई मुळे केंद्र सरकार विरोधात गॅस सिलेंडर ला हार घालून तर चुलीवर चहा करत व स्कूटी लोटगाडी वर नेत आनोखे आंदोलन…

दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी प्रशांत पाटील.

भुसावळ .
संयुक्त किसान मोर्चा व अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती ने देश भर पेट्रोल डिझेल,तेल व घरगुती गॅससिलेंडर च्या वाढत्या किंमती मुळे झालेल्या महागाईचा निषेध म्हणून देशभर आंदोलन करण्याचे आव्हान केले होते त्याचाच एक भाग म्हणून भुसावळ येथे लोक संघर्ष मोर्चाच्या बॅनर खाली आंदोलन करण्यात आले ह्या वेळी लोक संघर्ष मोर्चा च्या कार्यकर्त्यांनी भुसावळ प्रांत कार्यालयासमोर शेकडो लोक संघर्ष मोर्चा च्या कार्यकर्त्यांनी लोटगाडी वर स्कूटी ठेवून व गॅस सिलेंडर हार अर्पण करत आमच्या साठी ह्या वस्तू आत्ता फक्त म्युझियम मधल्या वस्तू बनतील कारण महागाईने आम्ही खरेदी करूच शकत नाही तसेच आत्ता चूल पुन्हा आमच्या नशिबी आली म्हणत कार्यकर्त्यांनी प्रांत कार्यालयासमोर चूल पेटवून चहा केला व तो सर्वांनी प्राशन केला. तसेच बहुत हो गई मंहगाई की मार अबकी बार नही मोदी सरकार अश्या घोषणा देण्यात आल्यात.

ह्या वेळी प्रतिभा शिंदे, सचिन धांडे,चंद्रकांत चोधरी, सलीम चुडीवाले यांनी भाषणे झालीत ह्या वेळी लोटगाडी वर स्कूटी ठेवून लोकांनी ती ढकलत आणली तसेच गॅस सिलेंडर हे मृत झाले आहेत त्यांना हार घालण्यात आले व चुलीवर चहा करत महागाई विरोधी बिगुल वाजविण्यात आला व केंद्र सरकारच्या महागाई विरोधी धोरणांचा तीव्र निषेध करण्यात आला ह्या वेळी प्रांत रामसिंग सुलाने यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले .ज्यात म्हटले आहे की
1) लोकशाहीचा गळा घोटून शेतकऱ्यांशी सल्ला मसलत न करता जे तीन शेतकरी विरोधी कायदे आणले आहेत ते कायदे ह्या देशातील भांडवल शहाणा , कार्पोरेट घरण्याना फायदा करण्या साठी आणले आहेत ते तात्काळ रद्द करण्यात यावे व एमएसपी वर आधारित सर्व पिकांवर हमी भाव ठरवण्यात यावा.
२) कोरोना मुळे ज्या परिवारातील कमावती व्यक्ती ला आपला जीव गमवावा लागला त्यांना पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी व त्यांच्या परिवारातील एका व्यक्तीला नौकरी त सामावून घ्यावे अथवा रोजगार उपलब्ध करून द्यावा
३) कोरोना च्या काळात प्रचंड महागाई वाढली असून पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस व तेल ह्या सारख्या मूलभूत गोष्टीची प्रचंड किंमत वाढल्याने लोकांवर उपासमारीची वेळ आली असून ही महागाई तात्काळ कमी करावी व लोकांना न्याय द्यावा असेही निवेदन देण्यात आले.

4) महाराष्ट्राने विधान सभेत केलेले शेतकरी कायद्याचा मंजूर केलेला मसुदा तात्काळ मागे घेवून केंद्रीय शेतकरी कायदे रद्द करण्याच्या शेतकरी संघटनेच्या मागणीला पाठिंबा द्यावा
ह्या आंदोलनात सचिन धांडे, दिपक काटे, नुरां तडवी , इरफान तडवी, महेंद्र गायकवाड, केशव वाघ, शेख शाबिर , भरत बारेला, भूषण जिव्हरी, हेमंत पाटील ,रंजना वाघ , रमेश बारेला यांच्या सह शेकडो कार्यकर्ते हजर होते ह्या वेळी मोदी सरकारच्या विरोधी घोषणा देत प्रांत कार्यालया समोरील परिसर लोक संघर्ष मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला होता.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!