राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कमिटी तर्फे संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात आला

दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी
प्रशांत पाटील

भुसावळ शहर कॉग्रेस कमिटी तर्फे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी चे माजी अध्यक्ष खासदार राहुल जी गांधी यांचा वाढदिवस मा. महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमिटी चे अध्यक्ष नाना भाऊ पटोले साहेब यांच्या आदेशानुसार संकल्प दिवस म्हणून साजरा करण्यात आला. केद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस महागाई, बेरोजगारी, शेतकरी विरोधी काळया कायद्याचा विरोध करुन काळया कायद्याची होळी करण्यात आली.

भाजपा सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. व संकल्प दिवसाच्या कार्यकत्याना शपथ देण्यात आली प्रत्येक कार्यकत्यानी सर्व सामान्य माणसा प्रर्यन्त जाऊन कॉग्रेस पक्षाची ध्येय धोरण विचार पोहचवा वा जोरदार घोषणाबाजी करून केद्र भाजपा सरकारचा निषेध करण्यात आला

यावेळी शहर कॉग्रेस कमिटी चे अध्यक्ष रविंद्र निकम जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष मो. मुन्वर खान, तालुका कार्याध्यक्ष राजेंद्र श्रीनाथ यांनी मार्गदर्शन केले

यावेळी शहर उपाध्यक्ष संतोष साळवे, महेंद्र महाले, सागर कुरेशी, राजेश डोंगरदिवे,शहर उपाध्यक्ष शैलेंद्र नन्नवरे शहर सरचिटणीस शैलेश अहिरे युवक विधानसभा अध्यक्ष इमान खान, भुसावळ शहर महिला अध्यक्ष यास्मिन बी वरणगाव शहर अध्यक्ष अशपाक काझी, रिटायर मुख्याध्यापक हमीद सर इसाक चौधरी, मुकुंद टेलर, रामअवतार परदेशी,विनोद भाऊ धांडे, महिला जिल्हा उपाध्यक्ष राणी ताई खरात, ऐनुर बी, अफरोज बी, सबिना बी, जिल्हा मुस्लिम अध्यक्ष हमिदा बी, सलमा बी शेख अकबर, सपना पगारे, दुर्गा ताई सोनवणे, वंदना चव्हाण, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!