भादली येथील रेल्वे उड्डाणपूलावरुन वाहतुकीस झाली सुरुवात

दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी प्रशांत पाटील

तरसोद ते फुलगाव रस्ते महामार्ग चौपदरीकरणाचे वाहतूक ही आता पूर्णत्वास होण्याच्या दिशेने दिसत असून भुसावळ कडून जळगावच्या दिशेने जाणारा नवीन उड्डाणपूल हा काही दिवसांपूर्वीच सुरू झाल्याने वाहनधारकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे व त्यातच आता भादली येथील रेल्वे उड्डाणपूल सुरू झाल्याने वाहन धारकांत आनंदाची अधिकच भर पडून आता नवीन बनवलेल्या रस्त्याचा सुसाटपणे वाहन चालवून वाहनधारक रस्त्याचा आनंद घेत मार्गस्थ होत आहे.

चिखली ते तरसोद फाट्यापर्यंत कुठलाही अडथळा निर्माण न होता यामध्ये माल वाहतूक वाहन आपत्कालीन स्थिती तील रुग्ण व सरकारी कार्यालयातील कर्मचारी प्रवासी शिक्षण घेणारे शालेय विद्यार्थी व इतर कामगारवर्ग आपल्या ठरलेल्या वेळेत पोहोचत वेळेची बचत होत आहे
जळगाव जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांनी
रस्ते व पूल निर्माण करणारी कंपनी नॅशनल हायवे अथोरिटी इंडिया आयुष कंपनी गावर व धारिवाल ग्रुपचे इंजिनीयर कर्मचारी व कामगार वर्गाचे आभार व्यक्त करत महामार्गाचे काम हे लवकरच पूर्ण होत असल्याचा आनंद व्यक्त केलेला आहे
बातमी शेअर करा :
error: Content is protected !!