रोटरी क्लब भुसावळ तर्फे शाडू माती पासून पर्यावरण पुरक गणपती बनविणे चे प्रशिक्षण उपक्रम
भुसावळ प्रतिनिधी –
रोटरी क्लब भुसावळ तेथे आकार हा प्रकल्प रोटरी क्लब भुसावळ आणि इनरव्हील क्लब-ब्लॉसम भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला आकार प्रकल्प हा शाडू माती पासून गणपती ची मूर्ती बनवण्यासाठी वयोमर्यादा 10 चे वरील लोकांसाठी ठेवण्यात आला होता सदर प्रकल्पासाठी दोन बैच मधे मिळून 70 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते याप्रसंगी क्लब तर्फे सर्व विद्यार्थ्यांना दोन किलो शाडू ,माती ब्रश, कार्ड बोर्ड आणि प्लास्टिक पुरवण्यात येऊन गणपती मूर्ती कशी बनवता येईल याबाबत प्रशिक्षण भुसावळातील प्रतिष्ठीत मूर्तिकार तथा रंगमंच कार श्री रमाकांत भालेराव यांनी मार्गदर्शन केले सदर प्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक तसेच रोटरी क्लब भुसावळ व इनरव्हील क्लब ब्लॉसम भुसावळ यांचे खालील पदाधिकारी उपस्थित होते याप्रसंगी रमाकांत भालेराव यांचे स्वागत व सत्कार श्री राजेंद्र कुमार भानुदास हेगडे अध्यक्ष रोटरी क्लब भुसावळ यांच्या हस्ते करण्यात येऊन इतर पाहुण्यांचा स्वागत इनरव्हील क्लब अध्यक्ष श्रीमती तृप्ती नागोरी यांच्या हस्ते करण्यात आले सदर प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभ रोटरीचे माजी अध्यक्ष व सीनियर सिटीजन श्री गजानन ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भुसावळच्या माजी अध्यक्ष शितल भराडिया यांचे मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आला याप्रसंगी रुचिता अग्रवाल पल्लवी झोपे राखी भराडिया श्वेता लड्डा इशा मनवाने अमृता बजाज श्वेता आरोरा राजेश अग्रवाल महेश भराडीया श्री गजानन ठाकूर श्री मदन बोरकर तसेच श्री राजेंद्र पाटील सचिव उपस्थित होते तसेच आभार रितिका हेड़ा यानी मानले त्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री मनोज बोला इतर यांनी परिश्रम घेतले.
मुलामंधील व लोकांनमधील सुप्त गुणांना वाव मिळावा व पर्यावरणात प्लॅस्टर ऑफ पॅरिस चे प्रदुषण होऊ नये आणि त्यांचे मुलावर योग्य वयातच संस्कार व्हावे या उद्शाने दरवर्षी पर्यावरण पुरक शाडू माती पासून गणपती बनविण्याचा उपक्रम घेत असतो . असे प्रशिक्षक रमाकांत भालेराव यांनी दै महाराष्ट्र सारथी शी बोलतांना सांगितले.