मध्य रेल्वे भुसावळ जंक्शन येथे डि आर एम कार्यालयात सी बी आय ची मोठी धाड लाचखोंर झाले भयभीत…

दैनिक महाराष्ट्र सारथी भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी प्रशांत पाटील यांचे कडून.

मंजूर निविदेची वर्क ऑर्डर देण्याकामी केली होती लाचेची मागणी.

जळगाव जिल्ह्यातील : भुसावळ येथील डीआरएम कार्यालयातील लाचखोरीचे प्रकरण हे सी बी आय ने उघड केले आहे. रेल्वेच्या विभागीय अभियंत्यासह कार्यालय अधिक्षकास लाचेची रक्कम घेतांना सीबीआय च्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
मंजूर निविदेची वर्क ऑर्डर देण्याकामी केली होती लाचेची मागणी.
नागपूर सी बी आय चे उपाधिक्षक एस आर चौगुले व दिनेश तळपे या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात लावलेला सापडा यशस्वी करण्यात आला मलकापूर येथील तक्रारदाराने नागपूर सीबीआय कडे तक्रार दाखल केली होती लाच घेणारे एम.एल. गुप्ता (विभागीय अभियंता) आहे तर संजीव रडे (कार्यालय अधिक्षक) आहे. अभियंत्याने दोन लाखाची तर कार्यालय अधिक्षकाने चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारली होती
.

एम.एल. गुप्ता (विभागीय अभियंता) यांचे निवासस्थान

16 ऑगस्टच्या दुपारी घडलेल्या या घटनेने रेल्वे डिआरएम कार्यालयासह भुसावळ शहरातील रेल्वे अधिकारी व कर्मचारी वर्गात व परीसरात मोठी खळबळ उडुन शहरातील नागरिकांमध्ये यासंदर्भात एक खमंग चर्चा सुरु होती
या लाचखोरीला उघड करण्यासाठी सीबीआय चे पथक गेल्या एक आठवड्यापासून मुक्कामी होते. भुसावळ येथील डीआरएम कार्यालयात लाचखोरीचे अनेक प्रकार सातत्याने सुरु असतात. मात्र बरेचशे प्रकार उघड न होता अधिकाऱ्यांच्या दबावात येऊन तक्रार न देता नाईलाजास्तव भ्रष्टाचाराला एक प्रोत्साहन पर देत असतात.
भारत सरकार व महाराष्ट्र शासन वेळोवेळी नागरिकांना जागृत करत सतर्क राहण्याचे आवाहन करत असते भ्रष्टाचाराला खतपाणी घालुन नका
वेळीच सी बी आय कार्यालयाशी संपर्क करा आम्ही आपल्या सेवेत सदैव आहोत असे सीबीआयने नागरिकांना आवाहन केलेले आहे.

✍🏻दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !आपण आपल्या परिसरातील बातमी 95940 47437 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपण आपल्या नावाने बातमी दिल्यास आमच्या दैनिक मध्ये प्रसिद्धी केली जाईल.
आपला विश्वासू
प्रशांत पाटील
भुसावळ तालुका ग्रामीण प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
95940 47437

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!