टी. आर. पाटील विद्यालय वडजी शाळेत भारतीय स्वातंञ्य लढ्याचे असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
भडगांव –
दिनांक 1.8.2021 वार रविवार रोजी टि आर पाटील विद्यालय वडजी येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमीत्त पुज्यनीय महापुरुषांच्या प्रतिमांचे पुजन मा. मुख्याध्यापक नाना सो श्री. डी डी पाटील सर व जेष्ठ शिक्षक आबासो बी वाय पाटील सर, श्री एस जे पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले
महापुरुषांच्या पुण्यतिथी व जयंती निमित्त विद्यालयात निबंध व वक्तृत्व स्पर्धा कोवीड 19 प्रतिबंधात्मक नियमानुसार घेण्यात आल्या
निबंध स्पर्धेत
1)पाटील कावेरी ञिलोक (10B)
2)पटेल सानिया शरीफ (10A) यांनी अनुक्रमे यश संपादन केले.
वक्तृत्व स्पर्धेत
1)राजपुत सुमित संजय(8B)
2)पाटील वैष्णवी रामकृष्ण (10B)
यांनी अनुक्रमे यश संपादन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरम सन्मानीय नानासाहेब प्रतापराव पाटील , सचीव डॉ सौ पुनम ताई पाटील व दादासाहेब प्रशांत पाटील आणि गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी साहेब, केंद्र प्रमुख श्री न्याहदे दादा व विद्यालयाचे मुख्याध्यापक नानासाहेब डी डी पाटील जेष्ठ शिक्षक बी वाय पाटील सर व एस जे पाटील सर आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधु भगिनी यांनी अभिनंदन केले आहे.
सदर स्पर्धा आयोजनात विद्यालयातील सांस्कृतिक समिती चे प्रमुख श्री वाय डी भोसले सर श्री डी एम पाटील सर श्री आर एम पाटील सर श्रीमती व्ही टी बिर्हाडे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधु भगिणी नी सहभाग घेतला.