लता मंगेशकर संगीतातील अनमोल हिरा- प्रा. सुरेश कोळी
भडगाव – तालुका प्रतिनिधी (राजू दिक्षित )
गान कोकिळा लता मंगेशकर यांनी संगीत क्षेत्रात आनंदघन या नावाने अनेक गाण्यांना संगीत दिले आहेत. लतादीदी म्हणजे कुटुंबातील आधारवड अनेक सहकलाकार व सहकारी यांना आर्थिक मदत त्या नेहमी करतात.मराठी, हिंदीसह अनेक भाषा मधून गित गाऊन जनसामाण्याना वेड लावणारी लताजी संगीत क्षेत्रातील आवाजातील गोडवा अमृता हून सरस आहे अनमोल हिरा आहे” असे प्रतिपादन प्रा. सुरेश कोळी, अध्यक्ष म. सा. प. पुणे शाखा भडगाव यांनीं लता मगेशकर जन्मदिना निमित्ताने “गीत गंगा” कार्यक्रमात व्यक्त केले . निलमणी प्रतिष्ठान व म. सा. प. पुणे शाखा भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने “गीत गंगा “चे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्यl अध्यक्षस्थानी नीलमणी प्रतिष्ठान चे सचिव डॉ. सी. एन. पाटील होते.
गीत गंगा कार्यक्रमात लता मंगेशकर च्या गीतांचे ऑनलाईन व ऑफलाईन सादरिकरण करण्यात आले यावेळी अनुराधा अंबोले, ठाणे – लगजा गले,स्वरा पाटील – अजीब दास्ता, डॉ.सीमा पाटील – इक प्यार का नगमा,लताताई पाटील – तूम्ही मेरी मंजिल,दीपक हिरे नवरदेवळा – तुजसे नाराज,सीमा पाटील – तूने ओ रंगीला, वैष्णवी पाटील मुंबई – मिल जाए ईस तऱ्हा,सरला कोळी – शिशा हो या दील, सीमा देशमुख – तुज मागतो मी आता, कल्पना पाटील अमळनेर – धिरे धीरे, अलका ठाकरे नंदुरबार – लिंबोणी च्यl , नीरज पाटील मुंबई – आजा सनम, रश्मी कोळी – ये मेरे वतन के, डॉ. एश्वर्या ठाकरे – ये मैं न जानू,या मधुर गीतांची मेजवानी रसिकांना मंत्रमुग्ध करणारी होती.गीत गंगा कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलमणी प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ. लताताई पाटील यांनी लता दीदींना मिळालेले भारत रत्न, तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सन्मानाचा उल्लेख केला. सूत्रसंचालन डॉ. निलेश पाटील यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. पल्लवी पाटील यांनी मानले.
______________________________________________________
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
आपण भडगाव तालुक्यातील बातमी 9730002081 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.
आपला विश्वासू
राजू दिक्षित
भडगाव तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-9730002081