वडजी टी.आर.पाटील विद्यालय, इंग्लिश मेडिअम स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात व्याख्यान व रांगोळी स्पर्धा संपन्न

भडगाव – तालुका प्रतिनिधी – ( राजू दिक्षित )

कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे टी.आर.पाटील विद्यालय, इंग्लिश मेडीअम स्कुल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील यांच्या २० व्या पुण्यस्मरण सप्ताह अंतर्गत रांगोळी स्पर्धा व व्याख्यान संपन्न झाले. रांगोळी स्पर्धेचे उद्दघाटन संस्थेच्या सचिव तथा जिल्हा दूध संचालिका डॉ.पुनमताई पाटील यांच्या हस्ते झाले. तसेच एस.पी.बावस्कर यांचे कष्टा विना फळ नाही या विषयांवर व्याख्यान आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविकात प्राचार्य डी.डी.पाटील यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षातील पुण्यस्मरण सप्ताह व विद्यालयाच्या प्रगतीत संस्थेने विविध सुविधा उपलब्ध करून वडजी सारख्या ग्रामीण भागासाठी 10 वी बोर्ड, 11 वी, 12 वी सायन्स, सुसज्ज 16 वर्ग खोल्यांची दुमजली इमारत, भव्य मैदान संरक्षण भिंत, नर्सरी ते 4 थी पर्यन्त इंग्लिश मेडिअम स्कूल, 5 वी ते 10 वी सेमी इंग्लिश व नॉन सेमी वर्ग, अद्ययावत संगणक कक्ष, प्रयोगशाळा, व्यायामशाळा, ग्रंथालय आदि सुविधा योगदान बाबत संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील व संचालक तथा मंत्रालय सचिव प्रशांतराव पाटील यांचे ऋण व्यक्त केले. सदर प्रसंगी विद्यालयाचे प्र.प्राचार्य मा.सरपंच बी.वाय पाटील, शालेय व्यवस्थापन समिती प्रमुख एस.जे.पाटील, जेष्ठ शिक्षक ई.एम.पाटील, वरिष्ठ लिपिक दिलीप पाटील, नियोजन समिती अध्यक्ष जे.एच.पवार, सांस्कृतिक समिती सदस्य डी.एम.पाटील, वाय.डी.भोसले, प्रसिद्धी प्रमुख आर.एच.बोरसे, प्रा.संदीप पाटील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन प्रतापराव हरी पाटील यांची नवी दिल्ली येथे सहकार परिषदेसाठी जळगाव जिल्हा प्रतिनिधीत्व म्हणून संधी मिळाली तसेच सचिव डॉ.पूनमताई पाटील यांना जळगांव दिव्यमराठी नारीशक्ति पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानिमित्त विद्यालयाच्या नारीशक्ति वैशाली बिरहाडे, पूनम पाटील, पुष्पा पाटील यांनी त्यांचा प्रातिनिधिक सत्कार केला. सूत्र संचालन कला शिक्षक वाय.ए.पाटील, आभार एम.एस.देसले, समारोप आर.एम.पाटील यांनी केला. संस्थेच्या संचालिका कोकीळाताई पाटील, जिजाताई पाटील, संचालक मा.नगराध्यक्ष श्यामकांत भोसले, इंजि.राहुल पाटील, गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, विस्ताराधिकारी गणेश पाटील, केंद्रप्रमुख संजय न्याहिदे, रविंद्र सोनवणे, मा.सभापती मनीषाताई पाटील, नारीशक्ति नगरसेविका योजनाताई पाटील, मुख्याध्यापक समन्वयक व स्थानिक स्कूल कमिटी आदि मान्यवरांनी मार्गदर्शनपर शुभेच्छया दिल्या आहेत.

____________________________________________________________________________________________________________________________________________________________

दैनिक “महाराष्ट्र सारथी”
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

आपण भडगाव तालुक्यातील बातमी 9730002081 या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवू शकता.

आपला विश्वासू
राजू दिक्षित
भडगाव तालुका प्रतिनिधी
दैनिक “महाराष्ट्र सारथी”
mob.-9730002081

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!