महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात मंडळाच्या जनहित याचिकेसंदर्भात सरकार पक्षाला ६ आठवड्यांची मुदत!

दैनिक महाराष्ट्र सारथी कार्यकारी संपादक शैलेंद्र ठाकूर यांच्या कडून..

महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळातर्फे औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिका क्रमांक ७१/२०२१ च्या सुनावणीत धुळे येथिल मंजूर जात पडताळणी कार्यालय नंदुरबार येथे हलविणे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाविरोधात असून सदर निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालय व मुख्यसचिव यांची आवश्यक ती परवानगी घेतली गेलेली नसल्याचे महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळाने सादर केलेल्या पुराव्यावरून स्पष्ट होत असल्याचे सांगत केलेल्या महत्वपूर्ण युक्तिवादा नंतर मा.उच्च न्यायालयाने शासनाकडून खुलासा सादर करण्याबाबत सरकारी वकिलांना सांगण्यात आले तसेच सरकार पक्षाने प्रलंबित माहिती आणि मा.उच्च न्यायालयाने आज सांगितल्याप्रमाणे संबंधित माहिती सादर करण्यास मुदत मागितल्याने ६ आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाने धुळे येथिल अनुसूचित जमाती पडताळणी समितीचे कार्यालय नंदुरबार येथे बेकायदेशीररित्या हलविले या मुद्यासंबंधित माहितीच्या अधिकारात मिळविलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण अद्ययावत अश्या गंभीर कागदपत्रांच्या आधारे आदिवासी विभागाकडून बेकायदेशीर घेतलेल्या निर्णयाविरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयात सुप्रसिद्ध असे जेष्ठ वकील ऍड.महेशकुमार देशमुख साहेबांनी जनहित याचिका दाखल केलेली होती.सदर याचिकेसाठी उपलब्ध माहितीसह आवश्यक कागदपत्रे, अत्यंत महत्वपूर्ण पुरावे महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळाचे जेष्ठ पदाधिकारी प्रकाश भामरे साहेब यांनी माहितीच्या अधिकारात मिळवलेली आहे.सदर माहितीचा उपयोग आदिवासी विकास विभागाच्या बेकायदेशीर निर्णयास न्यायालयासमोर आव्हान देतांना मा.ऍड.देशमुख साहेब अभ्यासपूर्वक करीत आहेत.सहा आठवड्यात शासनाच्या आदिवासी विभागाच्यावतीने मा.उच्च न्यायालयात कोणती माहिती सादर केली जाते याकडे महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळाचे लक्ष आहे.सदर याचिकेसाठी ऍड.महेश देशमुख हे विशेष परिश्रम घेत आहेत.तर महाराष्ट्र ठाकूर समाज मंडळाचे अध्यक्ष डॉ.जितेंद्र ठाकूर,सरचिटणीस रणजित शिंदे,प्रताप सूर्यवंशी, पंचप्रमुख एस एन ठाकूर, सल्लागार दिपक चव्हाण,याचिकेत मंडळाचे प्रतिनिधी असलेले कार्याध्यक्ष चंद्रकांत सैदानी,जेष्ठ पदाधिकारी प्रकाश भामरे ,जेष्ठ सल्लागार सतिष ठाकूर, जळगांव जिल्हाध्यक्ष गोपाळराव ठाकूर,धुळे जिल्हाध्यक्ष के टी ठाकूर,तालुकाध्यक्ष दिनेश देवरे , एस पी ठाकूर,नाशिक अध्यक्ष कैलास देवरे,बापू वाघ आदिंसह राज्यपदाधिकारी सातत्याने लक्ष घालून आहेत. सदर माहिती महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळाचे सरचिटणीस रणजित शिंदे सर यांनी प्रसिद्धी करिता कळविले आहे

            

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!