हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन तर्फे उर्दू माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळातील शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा!

राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरुस्कारासाठी प्रस्ताव सादर करावे- शेख अब्दुल रहीम

औरंगबाद- प्रेषित हजरत मोहम्मद च्या जन्मदिनानिमित्त म्हणजे ईद मिलादुन्नबी निमित्त हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन तर्फे दरवर्षी प्रमाणे सलग 7व्या वर्षी ही उर्दू माध्यमाच्या शिक्षकांसाठी राज्यस्तरीय निबंध स्पर्धा ठेवण्यात आली आहे यात फक्त उर्दू शिक्षक-शिक्षिका सहभाग घेऊ शकतात. यात विजेत्या शिक्षक-शिक्षिकानां तीन रोख बक्षिसे, प्रमाणपत्र तसेच शानदार ट्रॉफी प्रदान करण्यात येईल. शिक्षकांना फक्त निबंध या विषयावरच लिहायचं आहे “सिरतू नबी ﷺ का समाजी पहलू” किंवा “नबी ﷺ का मिशन और हम” या दोघांपैकी एका विषयांवर १००० ते १२०० शब्दात (4 ते 5 पेज )लिहून आपला नाव, शाळेचा नाव लिहून या पत्त्यावर पाठवायचं आहे. न्यू विनस फूट वेअर, शहीद भगतसिंग चौक, मेन रॉड सिल्लोड पिन कोड 431112.
टीप- निबंध फक्त पोस्टाणे पाठवायचे आहे लते ही 20 ऑक्टोबर 2021 च्या आत याची सर्वानी नोंद घ्यावी तसे हँड टू हँड स्वीकारले जाणार नाही…

💥 महाराष्ट्र राज्यातील व औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व मराठी माध्यम आणि उर्दू माध्यमांच्या शिक्षक-शिक्षिकसाठी दर वर्षी प्रमाणे सलग 7व्या वर्षी ही हॅप्पी टू हेल्प फॉउंडेशन तर्फे राज्य स्तरीय व जिल्हास्तरीय मराठी माध्यम आणि उर्दू माध्यमांच्या सर्व शिक्षक-शिक्षकांसाठी आदर्श शिक्षक पुरस्कार साठी आपले आपले प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर यांनी केली आहे. मराठी माध्यमातुन २ आदर्श शिक्षक पुरस्कार, उर्दू माध्यमातून २ राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच जिल्हास्तरीय मराठी मध्ये मनपा-१ , खाजगी-१ , जिल्हा परिषद-१ असे ३ आणि उर्दू माध्यम मध्ये जिल्हा परिषद-१ , खाजगी-१ , मनपातुन एक एक शिक्षक तसेच मराठी माध्यमातून १ चित्रकला शिक्षक आणि उर्दू माध्यमातून चित्रकला शिक्षक तसेच मराठी माध्यमातून १ क्रीडा शिक्षक व उर्दू माध्यमातून १ क्रीडा शिक्षक असे एकूण १४ शिक्षिका-शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरुस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे, तरी महाराष्ट्र राज्यातील व औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व शिक्षक-शिक्षिकांनी आपले प्रस्ताव 20 ऑक्टोबर 2021 पर्यंत पाठवावे. उर्दू माध्यमाच्या सर्व शिक्षक-शिक्षिकांनी शेख अब्दुल रहीम सर 9657524545 तसेच मराठी माध्यमाच्या शिक्षक-शिक्षिकांनी शफीक पठाण सर 9423451316 यांच्याशी संपर्क साधून आपला आपला प्रस्ताव सादर करावे…

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!