आमदार अनिल अनिल पाटलांची शहरास तीन कोटींची दिवाळी भेट..

वैशिट्यपूर्ण योजनेंतर्गत चौफेर होणार विकासकामांची आतिषबाजी

प्रतिनिधी – ( डॉ. सतिश भदाणे mob.- 9975595887 )

अमळनेर-यंदाच्या दिवाळीला फटाक्यांची आतिषबाजी होण्याआधीच आमदार अनिल पाटील यांनी शहरासाठी तब्बल तीन कोटींची दिवाळी भेट दिल्याने यातून चौफेर विकास कामांची आतिषबाजी होणार आहे,नगरपरिषदेच्या माध्यमातून मिळालेल्या या भेटीने त्यात्या भागातील नगरसेवक व जनता सुखावली आहे.

आमदार अनिल पाटील यांनी यापूर्वी देखील वैशिट्यपूर्ण अनुदान आणि ठोक अनुदानातून पालिकेस साडेसात कोटीची कोटींची विकासकामे मंजूर केली असून त्यात आता अजून तीन कोटींची भर पडली आहे,याव्यतिरिक्त नगरपालिकेची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी अजून साडेतीन लाखांचा निधी मंजूर होणार असल्याने आमदार अनिल पाटलांच्या काळात मोठ्या प्रमाणात विकासाची नांदी सुरू झाली आहे.सदर तीन कोटींच्या विकासकांसाठी नगरपरिषदेच्या वतीने नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील यांनी देखील मागणी केल्यानंतर आमदारांनी राज्याचे नगरविकास मंत्री ना एकनाथ शिंदे यांच्या कडे निधीसाठी पाठपुरावा केला होता,त्यास नुकतीच मंजुरी मिळाली आहे.वैशिट्यपूर्ण 12 कामांसाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत नगरपरिषदस 3 कोटींच्या निधी वितरित करण्याचे शासन आदेश दि 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्राप्त झाले आहेत.

ही आहेत शहरातील विकासकामे

अमळनेर न.पा. हदीतील रा.मा.15 ते मराठा मंगल कार्यालय पर्यंत रस्त्ता लगत दोन्ही बाजुला आर.सी.सी. गटारीराह ररता डांबरीकरण करणे 40 लक्ष,अमळनेर न.पा. हदीतील शाहलम नगर येथे क्लब हाऊस चे बांधकाम करणे 40 लक्ष,अमळनेर न.पा. हादीतील प्रभाग क्र. 7 मधील महात्माफुले कॉलनीतील
अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे,20 लक्ष,अमळनेर न.पा. हद्दीतील प्रभाग क्र. 8 मध्ये प्रभाकर जानकीराम बडगुजर ते उदय हिम्मतराव पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण करणे,10 लक्ष,अमळनेर न.पा. हदीतील प्रभाग क्र.8 मधील एल.आय.सी. कॉलनी मध्ये रस्ते कॉक्रीटीकरण करणे,10 लक्ष,अमळनेर न.पा. हद्दीतील प्रभग क्र. 8 मधील राधाकृष्ण नगर मधील
संजय ढोमण पाटील ते श्री.क.मा.साळुंखे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे 15 लक्ष,अमळनेर न.पा. हद्दीतील प्रभाग क्र.6 मधील गट क्र. 3588 मध्ये प्रोफेसर कॉलनी भागात खुली जागा विकसीत करणे.20 लक्ष,अमळनेर न.पा. हद्दीतील प्रभाग क्र.8 मध्ये आदर्श नगर मधील रस्ते
कॉक्रीटीकरण करणे.70 लक्ष,अमळनेर न.पा. हद्दीतील प्रभाग क्र. 14 मध्ये नागाई नगर भागात रस्ता खडीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.20 लक्ष,अमळनेर न.पा. हदीतील प्रभाग क्र.7मध्ये प्रसाद नगर भागातील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे,20 लक्ष,अमळनेर न.पा. हदीतील प्रभाग क्र.7 मध्ये आशिर्वाद नगर भागातील अंतर्गत रस्ते कोक्रिटीकरण करणे,15 लक्ष,अमळनेर न.पा. हदीतील प्रभाग क्र. 14 मध्ये आर.के.नगर भागातील रस्ते कॉक्रीटीकरण करणे 20 लक्ष आदी 12 विकासकामांचा समावेश आहे.
सदर विकास कामांच्या मंजुरीबद्दल नगराध्यक्षा सौ पुष्पलता पाटील, उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, सर्व नगरसेवक व नागरिकांनी आमदार पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!